जगातील सर्वात मोठी कंपनी देतेय 20 हजार लोकांना नोकर्‍या, 12 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- भारतात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ई-कॉमर्स सेवा देणारी अ‍ॅमॅझॉन इंडिया ही कंपनी भारतात 20 हजार जणांना नोकरी देणार आहे. कंपनी हंगामी तत्वावर कर्मचारी भरती करणार आहे. कोरोना संकटामुळे भारतात शॉपिंग मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स बंद आहेत. मात्र, ऑनलाइन शॉपिंगला परवानगी आहे.

देशात ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण वाढले आहे. याच कारणामुळे ई-कॉमर्स क्षेत्रातल्या अ‍ॅमॅझॉन इंडिया या बलाढ्य कंपनीने भाराततात हंगामी तत्वावर कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी सहा महिन्यासाठी हैदराबाद, पुणे, कोइम्बतूर, नोएडा, कोलकता, जयपूर, चंदिगड, मंगळुरू, इंदूर, भोपाळ, लखनौ या शहरांमध्ये कर्मचारी भरती करणार आहे.

हंगामी तत्वावर घेतलेले नवे 20 हजार कर्मचारी हे ठिकठिकाणी वर्क फ्रॉम होम पद्धतीने करूनच कस्टमर सर्व्हिस विभाग हाताळतील. ग्राहकांच्या तक्रारी, ग्राहकांकडून होणारी चौकशी ही कामं नवे कर्मचारी हाताळतील. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. कंपनीच्या वतीने ग्राहकांशी ई-मेल, चॅट, सोशल मीडिया आणि फोनद्वारे संवाद साधण्याचे काम नवे कर्मचारी करतील.

12 वी उत्तीर्ण तरुणांना संधी
12 वी उत्तीर्ण तसेच इंग्रजी, हिंदी आणि ज्या राज्यात काम करायचे आहे तिथल्या स्थानिक भाषेचे उत्तम ज्ञान असणाऱ्यां कर्मचारी भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जाणार आहे. संपनीत सध्या सतत परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार नवी भरती प्रक्रिया सुरु करत आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुकांनी [email protected] वर ईमेल पाठवू शकतात किंवा 1800-208-9900 वर कॉल करू शकतात.

कस्टमर सर्व्हिस विभागासाठी भरती
ऑनलाइन शॉपिंग वाढू लागल्यामुळे ग्राहकांच्या शका, त्यांचे प्रश्न, तक्रारी यांचे प्रमाण ही वाढू लागले आहे. हे विषय तातडीने हताळणे आवश्यक असल्यामुळे अ‍ॅमॅझॉन इंडिया कंपनीने कस्टमर सर्व्हिस विभागात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी भरती करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

7 वर्षात 7 लाख रोजगार निर्मिती
अ‍ॅमॅझॉन इंडिया कंपनीमुळे आतापर्यंत भारतात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षित्या 7 लाखापेक्षा जास्त रोजगार निर्मिती झाली आहे. कंपनीने मागील 7 वर्षात 7 लाखापेक्षा अधिक लोकांना नोकऱ्य दिल्या आहेत. तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक नेटवर्कमध्ये सातत्याने गुंतवणूक करून 2025 पर्यंत 10 लाखापेक्षा अधिक नवी रोजगार निर्मिती करण्याची योजना कंपनीने यावर्षी जाहीर केली आहे.