World Cancer Day : कॅन्सरपासून बचावासाठी काय खावं अन् काय नको ?, जाणून घ्या कॅन्सरचा धोका कमी करणारे ‘हे’ 5 फूड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॅन्सर अर्थात कर्करोगाबाबत अजूनही लोकांमध्ये भीती आहे. पण त्यापासून दूर राहता येते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात थोडा बदल करणे गरजेचे आहे. ह्रदयरोग, मधुमेह आणि कॅन्सरसारख्या आजारापासून दूर राहता येऊ शकते. कॅन्सर असा आजार आहे तो मानवी शरीरात हूळहळू शिरकाव करतो. त्यामुळे कॅन्सरपासून दूर राहण्याची तुमची जर इच्छा असेल तर प्रथमत: खाण्या-पिण्यात मोठा बदल करावा लागेल. अशाप्रकारचा बदल केल्यास तुम्ही कॅन्सरपासून दूर राहू शकता.

गाजर :
गाजर जास्त खाल्ल्याने कॅन्सरचा धोका टाळता येऊ शकतो. तसेच पोटाचा कॅन्सरवर 26 टक्क्यांपर्यंत फायदा होऊ शकतो. तर प्रोस्टेट कॅन्सरचा धोका 18 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.

बीन्स :
बीन्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने त्याला फायबरचे भांडार म्हटले जाते. गाजारात कोलोरेक्टल असते ते कॅन्सरविरोधात लढण्यासाठी सुरक्षा देते.

दालचिनी :
दालचिनीमध्ये रक्तशर्करा आणि सूज कमी करण्याची क्षमता असते. दालचिनी कॅन्सरला रोखण्यासाठी मदत करतो. दालचिनीचे तेल डोके आणि मानेचा कॅन्सर कमी करण्यास मदत करते.

कॅन्सरपासून दूर राहायचंय तर टाळा ‘या’ गोष्टी

प्रोसेस्ड मीट :
WHO ने दिलेल्या माहितीनुसार, प्रोसेस्ड मीट कॅन्सरचे कारण असू शकते. कॅन्सरला आमंत्रण देणारे पदार्थही म्हटले जाते.

दारू पिणे :
दारू कमी प्रमाणात प्यावी, असे डॉक्टरांकडून वारंवार सांगितले जाते. दारूमुळे कॅन्सरला आमंत्रण मिळू शकते. दारूचे प्रमाण जास्त झाल्यास तुमचे तोंड, गळा, यकृत आणि आतड्यांच्या कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते.

लठ्ठपणाही कारणीभूत
लठ्ठपणा हे कॅन्सरला आमंत्रण देणारे प्रमुख कारण आहे. त्यामुळे वजन कमी करणे फायद्याचे ठरू शकते.