धक्कादायक ! ‘या’ कारणामुळे मालकानं कर्मचाऱ्यांना पाजलं मासे अन् कोंबड्यांचं ‘रक्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खासगी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना टार्गेट असणे हि काही नवी गोष्ट नाही. मात्र जर हेच टार्गेट पूर्ण झाले नाही तर क्रित्येकदा कर्मचाऱ्यांना याची प्रचंड शिक्षा देखील भोगावी लागते. जर हेच टार्गेट पूर्ण केले तर कर्मचाऱ्यांना अनेक आकर्षक बक्षिसे त्याचबरोबर पगारामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते. मात्र चीनमधील एका कंपनीतील मालकाने टार्गेट पूर्ण न केल्याबद्दल आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेली शिक्षा पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. त्याचबरोबर अनेकांना किळस देखील येईल.

चीनमधील या कंपनीतील मालकाने आपल्या १२ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना टार्गेट पूर्ण न झाल्याची शिक्षा म्हणून मासे आणि कोंबड्यांचे रक्त पिण्याची अघोरी शिक्षा दिली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून जगभरात या व्हिडिओची चर्चा होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये हा मालक आपल्या कर्मचाऱ्यांना बादलीतून मासे काढत कच्चे खायला सांगत आहे. त्याचबरोबर तो आपल्या कर्मचाऱ्यांना शिक्षा म्हणून मासे आणि कोंबड्यांचे रक्त पिण्याची शिक्षा देत आहे. या व्हिडीओविषयी बोलताना या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि, या शिक्षेमुळे या कर्मचाऱ्यांना काम करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे म्हटले. त्याचबरोबर हि घटना सत्य असल्याचे देखील या कंपनीतील एका कर्मचाऱ्याने सांगितले. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी या विषयी कोणतीही तक्रार केली नसून ते स्वतः या शिक्षेत सहभागी झाल्याचे देखील या कर्मचाऱ्याने सांगितले.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून यामध्ये दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याआधी देखील चीनमध्ये अशा प्रकारच्या शिक्षा देण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like