विश्वकप २०१९ : दोन संघांचे गुण सारखे झाले तर घेतला जाणार ‘हा’ निर्णय

लंडन : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ ची सुरूवात आजपासून पासून होत आहे. इंग्लंडमधील ११ शहरांत तब्बल ४८ सामने रंगणार आहेत. क्रिकेट प्रेमींसाठी हा क्रिकेटचा कुंभमेळाच आहे. जगातील सर्वोत्तम १० देशांचा समावेश असलेली हि स्पर्धा चार वर्षातून एकदा खेळवण्यात येते. त्यामुळे जगभरातील क्रिकेट रसिक याकडे डोळे लावून बसलेले असतात.

सर्वच संघ यासाठी जोरदार तयारी करता आहेत. १० संघ एकमेकांविरुद्ध या स्पर्धेत प्रत्येकी ९ सामने खेळणार आहेत. हा विश्वचषक राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवला जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत एकूण १० संघांनाच सहभाग घेता आला आहे. गुणतालिकेतील अव्वल चार संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश करतील.त्यानंतर क्रमांक एक आणि क्रमांक चार या संघात सामना होईल आणि क्रमांक दोन आणि तीन यांच्यात सामना होईल.

जर दोन संघांचे समान गुण झाले तर

जर दोन संघांचे गुण सारखे झाले तर ज्या संघाने अधिक विजय मिळवले आहेत त्या संघाला पुढे प्रवेश देण्यात येईल. समजा भारताने ६ विजयात १२ गुण मिळवले असतील आणि पाकिस्तानने ५ विजयात १२ गुण मिळवेल असतील तर भारताला पुढे जाण्याची संधी देण्यात येईल. त्यामुळे जर दोन्ही संघाचे विजय समान असतील तर नेट रनरेटच्या आधारे संघाना पुढे प्रवेश दिला जाईल.

या नवीन नियमाचा फायदा

याआधी या स्पर्धेत फक्त अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात येत होता, मात्र या वर्षीपासून उपांत्य सामन्यांसाठी देखील राखीव दिवस ठेवण्यात येणार आहेत.

एवढी असेल बक्षीस रक्कम –

या विश्वचषकाची संपूर्ण मिळून बक्षीस रक्कम ही ७० कोटी रुपये एवढी असणार आहे. विजेत्याला त्यातील ४० कोटी रुपये तर उपविजेत्याला १२ कोटी रुपये एवढी रक्कम बक्षीस म्हणून मिळेल.

https://mahasports.co.in/cwc-2019-what-happens-if-teams-are-tied-on-points/