‘या’ कारणामुळं टीम इंडिया हारली : कॅप्टन विराट कोहली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील काल झालेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने भारताला पराभूत करत सेमीफायनलमधील आपल्या प्रवेशाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. काल झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा ३१ धावांनी पराभव केला. भारतीय संघाचा या स्पर्धेतील हा पहिलाच पराभव ठरला. या विजयासह इंग्लंड गुणतालिकेत पुन्हा चौथ्या क्रमांकावर आले असून इंग्लंडच्या या विजयामुळे पाकिस्तानच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याच्या स्वप्नाला सुरुंग लागला आहे. या पराभवानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने माध्यमांशी संवाद साधताना भारतीय संघाच्या पराभवाचे कारण सांगितले.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने सलामीवीर जॉनी बेयरस्टो याच्या शानदार शतकी खेळीने आणि बेन स्टोक्स याच्या अर्धशतकी खेळीने ३३८ धावांचा डोंगर उभा केला. या धावांचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित शर्मा याच्या शतकी खेळीनंतर देखील भारतीय संघाला ३०६ धावांवर रोखले. या पराभवाविषयी बोलताना विराट कोहली म्हणाला कि, भारतीय फलंदाज आणखी चांगले खेळले असते तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा असता, मात्र भारतीय फलंदाजांनी उत्तम फलंदाजी केली.

सुरुवातीला इंग्लंड ३५० च्या वर जाईल असे वाटत असताना भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या ओव्हरमध्ये उत्तम गोलंदाजी करत इंग्लंडला ३३७ धावांत रोखले. त्यामुळे गोलंदाजांनी त्यांचे काम चोखपणे पार पाडले. मात्र आज फलंदाजीत भारतीय संघ कमी पडल्याचे देखील विराटने यावेळी बोलताना सांगितले.

सुरुवातीला आम्ही संथ फलंदाजी केल्याने मधल्या फळीतील फलंदाजांवर दबाव वाढल्याने हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत हे धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात बाद झाल्याने संघावरचा दबाव वाढला. त्यानंतर विकेट पडत गेल्याने आमचा पराभव झाला. मात्र उर्वरित सामन्यात दमदार कामगिरी करत भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देखील कोहलीने सांगितले.

दरम्यान, भारतीय संघाचे सात सामने झाले असून आणखी दोन सामने राहिले असून या सामन्यांत विजय मिळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. भारतीय संघाचे बांगलादेश आणि श्रीलंका यांच्याविरुद्ध सामने बाकी आहेत.

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा

 ‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

 ‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

शाकाहारीं नो, पौष्टिकतेवर लक्ष द्या ; प्रोटिनयुक्त पदार्थ शरीराला आवश्यक

शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत चिकित्सा ठरते उपयोगी