ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक म्हणतो, ‘या’ खेळाडूचा खेळ म्हणजे महेंद्र सिंह धोनीचं ‘NEXT EDITION’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसीने वर्ल्डकप स्पर्धेत सर्वच संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ च्या पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडची टीम ११ पॉईंट्स मिळवत अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर १० पॉईंट्स मिळवत ऑस्ट्रेलिया आहे. टीम इंडिया ९ पॉईंट्नी तिसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लड आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

या स्पर्धेत भारत ज्याप्रकारे खेळत आहे आणि सध्या भारतीय संघाचा फॉर्म बघता या स्पर्धेत भारतीय संघालाच संभाव्य विजेते म्हणून पहिले जात आहे. कर्णधार विराट कोहली आणि त्याचे शिलेदार या स्पर्धेत या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत असून भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. हि स्पर्धा आता मध्यावर आली असून त्यामुळे गुणतालिकेत सर्वात वर असलेले चार संघच सेमीफायनलमध्ये जाणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

मात्र या सगळ्यात ऑस्ट्रलियन प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी एक विधान करून खळबळ उडवून दिली आहे. इंग्लंचा फलंदाज जोस बटलर हा पुढील धोनी असून त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. त्याचबरोबर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले कि,मंगळवारी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी आम्ही खूप उत्सुक असून या सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न असेल. महेंद्रसिंग धोनी हा आपल्या फिनीशींसाठी ओळखला जातो. गेली अनेक वर्ष तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिनिशरची भूमिका सातत्य राखून पार पडत आहे.

भारतीय संघाला अनेक वेळा त्याने त्याच्या या कामगिरीने विजय मिळवून दिलेला आहे. त्याचबरोबर पुढे तो बटलरचे कौतुक करताना म्हटले कि, बटलर एक अप्रतिम खेळाडू असून मला त्याची फलंदाजी फार आवडते. दरम्यान, या स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्ध झालेल्या इंग्लंडच्या पराभवाबद्दल बोलताना ते म्हणाले कि, इंग्लंड सध्या जगातील सर्वश्रेष्ठ संघ असून श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पराभवाने त्यांना काही फरक पडणार नाही. त्याबरोबरच ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार असून पुढील सामन्यात उत्तम कामगिरी करेल असा विश्वास देखील त्याने व्यक्त केला.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?