ICC World Cup 2019 : केदार जाधव ऐवजी ‘या’ खेळाडूला संधी द्या : सचिन तेंडुलकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील काल झालेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने भारताला पराभूत करत सेमीफायनलमधील आपल्या प्रवेशाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. काल झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा भारताचा ३१ धावांनी पराभव केला. त्यानंतर सेमीफायनलची रेस आणखीनच टक्करची झाली असून सर्वच संघाची नजर उर्वरित सामन्यांकडे लागली आहे.

सलामीवीर फलंदाज शिखर धवन जखमी झाल्याने के. एल. राहुल याला सलामीला संधी दिल्याने त्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याला संधी देण्यात आली. मात्र त्याने देखील या संधीचा फायदा घेतला एनाही. आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात त्याने काही विशेष कामगिरी केलेली नाही. त्याचबरोबर विजय शंकरनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२ सामन्यात २२३ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या ऐवजी कालच्या सामन्यात रिषभ पंत याला संधी देण्यात आली. मात्र रिषभ पंतनंतर आता केदार जाधव याच्या जागी देखील दुसरा खेळाडू खेळवण्यात यावा याची मागणी होत आहे.

यासंदर्भात बोलताना भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याने बोलताना म्हटले आहे कि, केदार जाधवच्या जागी रविंद्र जडेजाचा संघात समावेश करण्याबाबत संघ व्यवस्थापनाने विचार करावा, असा सल्ला दिला आहे. १९९२ नंतर पहिल्यांदा इंग्लंडने विश्वचषकात भारताचा पराभव केला आहे. एका खासगी मुलाखतीत बोलताना त्याने इंग्लंडच्या सामीवीरांचे देखील कौतुक केले. त्यावेळी एखादा डावा फिरकी गोलंदाज संघात हवा होता. याचा फायदा भारतीय संघाला झाला असता. त्यामुळे केदार जाधवच्या जागी जडेजाला खेळवले तर तो फलंदाजीबरोबरच उत्तम गोलंदाजीदेखील करू शकतो असे सचिनने म्हटले आहे. दरम्यान, सचिन तेंडुलकरच्या या विचारावर आणि सल्ल्यावर भारतीय संघ व्यवस्थापन काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आश्चर्यच ! आता पोटातील गॅस बाहेर पडताच दुर्गंधी ऐवजी दरवळेल सुगंध

‘केस गळणे’ हा असू शकतो आजारपणाचा संकेत

‘मेंदू’ आणखी तल्लख करण्यासाठी ‘हे’ उपाय आहेत फायदेशिर

#Doctorsday2019 : पती आणि समाजाशी लढा देत ‘ती’ बनलीपहिली महिला सर्जन

यांनी दिलाय अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा