आनंद तेलतुंबडेंना जागतिक अभ्यासकांचा पाठींबा

वृत्तसंस्था – डॉ. आनंद तेलतुंबडे यांना पाठिंबा देण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय विद्यापीठांमधील सहाशेपेक्षाही अधिक अभ्यासक सरसावले आहेत. भारत आणि महाराष्ट्र सरकारने तेलतुंबडे यांच्यावर खोटे आरोप ठेवले आहेत. तसेच त्यांच्यासारख्या विद्वान सामाजिक कार्यकर्त्याला अटक केल्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे. त्यांच्यावर आरोप करणे त्वरित थांबवावेअशी विनंती अभ्यासकांनी एका संयुक्त निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन प्रिन्स्टनहार्वर्डयेलऑक्सफर्ड आणि लंडन स्कुल ऑफ इकनॉमिक्समधील अभ्यासकांनी संयुक्तरीत्या प्रसिद्ध केले आहे.

तेलतुंबडे यांचे लोकशाहीजागतिकीकरण आणि सामाजिक न्यायावरील लेखन आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासात महत्त्वपूर्ण योगदान आहे. महाराष्ट्र पोलिसांनी २८ ऑगस्ट २०१८ रोजी तेलतुंबडे यांच्या घराची अवैधरीत्या झडती घेतली. केंद्र व राज्य सरकारने तेलतुंबडे यांच्यावर निराधार आरोपांच्या आधारे कारवाई केली आहे. असा प्रकारची कारवाई ही लोकशाही आणि नागरी स्वातंत्र्यावरील हल्ला असूनत्यावर त्वरित विचार करणे गरजेचे आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

मुकेश अंबानीच्या मोठ्या मुलाचा ‘या’ बड्या व्यापाऱ्याच्या कन्येशी विवाह