लैंगिक अत्याचार प्रकरण ! अनुराग कश्यपच्या विरूध्द अभिनेत्री पायल घोषनं दिली लेखी तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी अभिनेत्री पायल घोषने मंगळवारी दिग्दर्शकाविरूद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे. तिने वर्सोवा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान तिचे वकील नितीन सातपुतेही तेथे होते.

पायलचे वकील नितीन सातपुतेने बलात्काराच्या घटनेची तारीख आठवत नसल्याच्या आरोपावर म्हटले की, पीडितेला सर्व काही आठवते आणि तिने घटनेशी संबंधित सर्व माहिती देखील दिली आहे. ते म्हणाले की, हे विचार करून केले गेले होते. कारण आम्हाला वाटले होते की, आरोपी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करेल.

महत्वाचे म्हणजे पायल घोषने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ट्वीट करून अनुराग कश्यपविरूद्ध लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. ती म्हणाली की, सुमारे ६ वर्षांपूर्वी अनुरागने त्याच्या घरी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. पायलच्या या आरोपानंतर गोंधळ उडाला.

एका वृत्तसंस्थेनुसार, पायल म्हणाली की, अनुराग कश्यप दाखवतो की तो महिलांचा आदर करतो पण वास्तविक जीवनात तो तसा नाही. तो मुखवटा घालतो. त्याने ज्या अभिनेत्रींचे नाव सांगितले यावरून हे सिद्ध होते की, महिलांसाठी अनुरागच्या मनात काही आदर नाही.

अनुरागने स्पष्टीकरण दिले आहे
या प्रकरणात अनुराग कश्यपने स्वत: पुढे येऊन आपली बाजू मांडली आहे. त्याने एकामागून एक तीन ट्विट केले होते. त्याने ट्विटमध्ये लिहिले होते- अद्याप बरेच हल्ले होणार आहेत. ही फक्त सुरूवात आहे. बरेच फोन आले आहेत, नाही म्हणू नको आणि गप्प बस. हे देखील माहित आहे की, माहित नाही कि कुठून-कुठून हल्ले होणार आहेत. यासोबतच अनुरागने आपल्या वकिलाचे निवेदन जारी करत या प्रकरणी आपली बाजू मांडली होती.