राज्यात बारावीच्या कॉपी वीरांचा सुळसुळाट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा विभागाच्या बारावी इयत्तेच्या परीक्षा सध्या सुरु आहेत. परीक्षे दरम्यान पाच दिवसांच्या कालावधीत ३००हुन अधिक कॉपी प्रकरणे समोर आल्याने राज्यात कॉपी वीरांचा सुळसुळाट माजला आहे. त्यात २५ फेब्रुवारी रोजी तर महाराष्ट्राने उच्चांकच नोंदवला आहे. कारण या एका दिवशी महाराष्ट्रात १३९ कॉपी प्रकरणे उघडकीला आली.

राज्य परीक्षा मंडळाकडून परीक्षेदरम्यान कॉपी प्रकरणाची नोंद केली जाते. मागील पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात कॉपी प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. २१ फेब्रुवारीला १२ वीची परीक्षा सुरु झाली. त्या दिवशी ७५ कॉपी प्रकरणे राज्य भरात उघडकीस आली. २२फेब्रुवारीला १५ प्रकरणे, २३फेब्रुवारीला ५६प्रकरणे उघडकीस आली. तसेच २५ फेब्रुवारीला १३८ प्रकरणे तर २६फेब्रुवारीला २२ प्रकरणे उघडकीला आली.

राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने कॉपी प्रकारावर आळा घालण्यासाठी २५२ पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्रांचे चित्रीकरण देखील करण्याच्या सूचना देखील परीक्षा मंडळाने दिला आहेत. कॉपी बद्दल खबरदारी बाळगली असताना देखील कॉपीची एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रकरणे समोर आली आहेत. तर विद्यार्थ्यांनी कॉपी सारख्या गैरप्रकाराच्या आहारी जाऊ नये. तसेच दोषींवर कडक कार्यवाही करण्यात येईल असे शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी म्हणले आहे.