WBBL | टीम इंडियाच्या कॅप्टनची ऐतिहासिक कामगिरी, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली महिला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – WBBL | टीम इंडियाच्या पुरूष खेळाडूंना अन्य देशातील टी20 लीगमध्ये खेळण्यास परवानगी नाही आहे मात्र महिला खेळाडूंना परवानगी आहे. या संधीचा फायदा घेत टीम इंडियाची महिला टी 20 संघाची (Team India Women T20) कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) एक ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावावर केली आहे. हरमनप्रीत कौरला महिलांच्या बिग बॅश स्पर्धेच्या (WBBL) या सिझनमधील ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ (‘Player of the Tournament’) हा ‘किताब मिळाला आहे. हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.

 

हरमनप्रीतने मेलबर्न रेनेगेड्सकडून (Melbourne Renegades) खेळताना 2021 च्या सिझनमध्ये 66.50 च्या सरासरीनं 399 रन काढले. त्याचबरोबर तिनं 20.40 च्या सरासरीनं 15 विकेट्ससुद्धा घेतल्या आहेत. यामध्ये तिच्या तीन अर्धशतकांचा देखील समावेश आहे. हरमनप्रीतचा या स्पर्धेतील आजवरचा सर्वोच्च स्कोअर नाबाद 81 आहे. मेलबर्नची टीम प्ले ऑफमध्ये दाखल झाली असून तिची पुढील लढत गुरुवारी होणार आहे. या मॅचमध्ये मेलबर्नचा विजय झाल्यात ती टीम 29 नोव्हेंबरला पर्थ स्कॉचर्स (Perth Scotchers) विरूद्ध फायनल खेळेल.

 

हरमनप्रीतचा या स्पर्धेतील (WBBL) महिला टीममध्येही समावेश करण्यात आला आहे.
हरमनची बॅटींग तर सर्वांना माहिती आहे.
पण या सिझनमध्ये लेग स्पिनर जॉर्जिया वारेहम (Leg spinner Georgia Wareham) जखमी झाल्यानंतर तीनं बॉलिंगमध्येही दमदार कामगिरी केली आहे.
या सिझनच्या टीममध्ये निवड झालेली ती एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे.
या स्पर्धेत (WBBL) शतक झळकावणाऱ्या स्मृती मंधानालाही (Smriti Mandhana) या टीममध्ये जागा देण्यात आली नाही.

 

Web Title :- WWBL | indian women t20 captain harmanpreet kaur creates history after becoming player of the tournament in wbbl 2021

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Amrapali Dubey | ‘निरहुआ हिंदुस्तानी’ चित्रपटातील अभिनेत्री पावसामध्ये रडून करायची मन मोकळं, जाणून घ्या रडण्यामागचं कारण..

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 106 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Chitra Wagh | चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल; म्हणाल्या – ‘सरकार आणि पोलीस मुर्दाड असले तरी आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास’ (व्हिडिओ)