चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी दिले पाकिस्तानला 3 झटके

चेन्नई : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात महाबलीपुरम येथे झालेल्या दुसऱ्या बैठकीमध्ये काश्मीर मुद्दा उपस्थीत झाला नाही किंवा त्यावर चर्चा झाली नाही. हा इम्रान खानला दुसरा मोठा धक्का आहे. कारण काश्मीरच्या मुद्यावर आपली बाजू मांडण्यासाठी इम्रान खान चीनला गेले होते. मात्र, काश्मीर मुद्यावर भारताची भूमिका स्पष्ट आहे. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे याची कल्पना चीनला आहे.

भारत सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर करुन जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले होते. भारताच्या या निर्णयावर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड गदारोळ केला. पण टर्की, मलेशिया आणि चीन वगळता पाकिस्तानला कुठल्याही देशाचा पाठिंबा मिळाला नाही. संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया प्रमुख इस्लामिक देशांनीही पाकिस्तानची साथ दिली नाही.

क्षी जिनपिंग यांनी भारत दौऱ्याच्या एक दिवस अगोदर म्हटले होते की, काश्मीर मुद्दा हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय विषय आहे. यामध्ये इतर कोणाचा हस्तक्षेप योग्य नाही. आज मोदी-जिनपिंग यांच्यामध्ये जागतिक दहशतवाद आणि त्यातून उद्भवणार्‍या धोक्यावर चर्चा झाली. चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदींना चीन भेटीचे निमंत्रण दिले आणि पंतप्रधान मोदींनीही त्यांचे आमंत्रण स्वीकारले तेव्हा पाकिस्तानला तिसरा मोठा धक्का बसला.

Visit : Policenama.com