फक्त 9 हजारात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि डिस्क ब्रेकसह Yamaha Fascino 125 स्पेशल एडिशन करा खरेदी; मिळेल 68 kmpl मायलेज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Yamaha Fascino 125 | आजकाल टू व्हीलर सेक्टरच्या स्कूटर सेगमेंटमध्ये एक खूप मोठी रांग आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बजेट नुसार आणि तुमच्या गरजेनुसार स्कूटर मिळतील.जर तुम्ही मायलेज आणि स्टाइलच्या दृष्टीने मजबूत असलेल्या बाइकऐवजी स्कूटर शोधत असाल, तर तुम्हाला यामाहा फॅसिनो 125 च्या (Yamaha Fascino 125) स्पेशल एडिशन ची संपूर्ण माहिती येथे मिळेल.

Yamaha Fascino 125 स्पेशल एडिशन खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 72,030 ते 80,900 रुपये खर्च करावे लागतील, परंतु येथे नमूद केलेल्या प्लॅनसह, तुम्ही ही यामाहा फॅसिनो 125 स्पेशल एडिशन अगदी सहज डाउन पेमेंटसह घरी घेऊन जाऊ शकता.टू व्हीलर सेगमेंटची माहिती देणारी वेबसाईडवर BIKEDEKHO दिलेल्या डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, तुम्ही ही स्कूटर खरेदी केल्यास, कंपनीशी संबंधित बँक त्यावर 88,195 रुपये कर्ज देईल.या कर्जावर तुम्हाला किमान 9,800 रुपये डाउन पेमेंट भरावे लागेल, त्यानंतर तुम्हाला दर महिना 3,156 रुपये मासिक EMI भरावा लागेल. यामाहा फॅसिनो 125 स्पेशल एडिशनसाठी कर्जाचा कालावधी बँकेने 36 महिन्याचा ठेवला आहे आणि बँक या कर्जाच्या रकमेवर 9.7 टक्के दराने व्याज आकारेल.

जर तुम्हाला ही स्कूटर विकत घ्यायची असेल, तर या डाउन पेमेंट योजनेनंतर, त्याची फीचर्स आणि स्पेसिफिकेशनची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

यामाहा फॅसिनो 125 ही आकर्षक डिझाईन असलेली स्कूटर आहे जी लांब मायलेजसाठी देखील पसंत केली जाते.कंपनीने या स्कूटरला 9 वेरिएंटसह लॉन्च केली आहे.

या स्कूटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने
125 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे जे फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन 8.2 PS ची
पॉवर आणि 10.3 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते,
त्याचबरोबर या स्कूटरचे ट्रान्समिशन ऑटोमॅटिक दिले जाते.

स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टिम बद्दल सांगायचे तर,
कंपनीने तिच्या पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील
चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे.मायलेजबद्दल
कंपनीचा दावा आहे की स्कूटर 68.75 kmpl चा मायलेज देते
आणि हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित केले आहे.

Web Title :- Yamaha Fascino 125 | yamaha fascino 125 special edition with down payment 9 thousand and easy emi plan read full details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 80 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुण्यात बॉलपेनवरुन घरफोडीचा गुन्हा उघड, विमानतळ पोलिसांकडून 29 लाखांचा मुद्देमाल जप्त; जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | पुण्याच्या हिंजवडीत विद्युत डीपीवर चढून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न