Yashomati Thakur On MVA Government | ‘महाविकास आघाडीत सत्तेत असल्यासारखी वागणूक मिळत नाही’ – यशोमती ठाकुर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Yashomati Thakur On MVA Government | महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi Government) घटक पक्षांना विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमिकेवर एक वेगळा धक्का बसला आहे. पुण्यात महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी मोठं विधान केले आहे. महाविकास आघाडीच्या सत्तेत असून आम्हाला पुण्यात सत्तेत असल्यासारखी वागणूक दिली जात नाही. खरं बोलायला आपण कुणालाही घाबरत नाही, असे धक्कादायक विधान यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

 

विधान परिषद निवडणुक जिंकण्यासाठी महाविकास आघाडी कसून प्रयत्न करत असताना अशाप्रकारचे वक्तव्य काँग्रेसच्या एका मंत्र्याने करणे धक्कादायक आहे. यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यशोमती ठाकूर यांनी आज चाकण येथील महिला मेळाव्यात बोलताना हे वक्तव्य केले आहे. (Yashomati Thakur On MVA Government)

 

मंत्री यशोमती ठाकूर यांचे हे वक्तव्य म्हणजे महाविकास आघाडी अंतर्गत कुरबुरी सुरू असल्याचा पुरावा आहे. जरी तीनही घटक पक्ष आणि त्यांचे नेते सर्वकाही अलबेल असल्याचे वारंवार सांगत असले तरी अंतर्गत धुसफुस महाविकास आघाडीत सुरू असल्याचे यावरून स्पष्ट होते.

यापूर्वी देखील अशा अंतर्गत कुरबुरीच्या बातम्या बाहेर आलेल्या आहेत, आणि प्रत्येकवेळी महाविकास आघाडीतील नेते त्यावर पांघरून घालत असतात.
शिवाय याचाच फायदा घेत विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे नेते, हे सरकार कोसळणार आणि आम्ही पुन्हा सत्तेत येणार, अशा घोषणा करत असतात.
मात्र, यावेळी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमिवरच आघाडीतील एका मंत्र्याने अशी खंत व्यक्त केल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

 

आता महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांकडून यावर कोणती प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज्यात महाविकास आघाडी झाली. मात्र पुणे जिल्ह्यात काँग्रेसला सत्तेत असल्यासारखी वागणूक दिली जात नाही.
महाविकास आघाडीत काँग्रेसला दुय्यम वागणूक दिली जात आहे, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
यशोमती ठाकूर यांनी हा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसवर केला असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

 

Web Title :- Yashomati Thakur On MVA Government | congress leader and minister
yashomati thakur big statement about maha vikas aghadi in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा