होय, स्वातंत्र्यानंतर प्रथमच पुणे जिल्हयातील ‘या’ गावात एसटीची सेवा सुरु !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात दुर्गम भागातील साकुर्डीमधील ग्रामस्थ सध्या आनंदित आहेत. कारणही महत्वाचे आहे, दळणवळणाचा प्रश्न सुटल्याने ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे, कारण स्वातंत्र्यानंतर प्रथमच या गावात एसटीची बस सेवा सुरु झाली आहे. ग्रामीण भागाच्या दळणवळणासाठी एसटीची बस सेवा हे एकमेव साधन मात्र असे असतानाही खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात असणाऱ्या साकुर्डे या दुर्गम भागात दळणवळणासाठी ग्रामस्थ, शाळकरी मुलांना संघर्ष करावा लागत होता.

देशाला स्वातंत्र्य मिळूनही आजतागायत या गावाला एसटीची सेवा नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना आजवर सामोरे जावे लागत होते. आजही साकुर्डी व चासकमान धरणाच्या डोंगराळ भागातील अनेक गावांना दळणवळणासाठी संघर्ष करावा लागत होता. मात्र साकुर्डी गावात एसटीची सेवा आता पोहचल्याने दुर्गम भागातील अनेक गावांना आधार मिळाला आहे.

आजवर राजगुरूनगरला पोहचण्यासाठी तारेवरची कसरत आणि पावसाळ्यात संपर्कहीन होणाऱ्या या गावांना आता जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या प्रयत्नामुळे दिलासा मिळाला आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच एसटी बस आल्याचे पाहून ग्रामस्थ हरखून गेले. शाळकरी मुलांनी एसटीची पूजा केली. राजगुरूनगर ते साकुर्डी वडगाव पाटोळे-दोंदे-सायगाव-वेताळ मार्गे ही एसटी बससेवा कायमस्वरूपी सुरु राहावी अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

आरोग्यविषयक बातम्या

सकाळचा चहा करतो ताण-तणावापासून सुटका, आहेत विविध फायदे

मधुमेहावर मिळवू शकता नियंत्रण, हे फार नाही अवघड

दिवसातील २४ तासांपैकी २३ तास तुमचेच, फक्त १ तास शरीरासाठी द्या