योगा मानवी जीवनातील एक जीवनावश्यक भाग- ब्रह्ममुहूर्त योग ज्ञानपीठाचे गुरुदेव दीपकजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – योगा हा मानवी जीवनातील एक जीवनावश्यक भाग होऊ लागला आहे. शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी योगा हा उत्तम पर्याय ठरत आहे. योगामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते. मन शांत होऊन एकाग्रतेत वाढ होण्यास मदत होत आहे. निर्णयक्षमता वाढते. वजन नियंत्रणात येते, आत्मविश्वास वाढतो व मनातील भीती दूर होण्यास मोठी मदत होत आहे, असे ब्रह्ममुहूर्त योग ज्ञानपीठाचे गुरुदेव दीपकजी यांनी सांगितले.

गुरुदेव दीपकजी म्हणाले की, कोरोना महामारीच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत मुलांना संसर्ग होण्याची भीती पालकांना सतावत आहे. त्यातच, गेले वर्षभर लॉकडाउनमुळे शाळा-महाविद्यालये बंद असल्याने मुलांना घराच्या बाहेर पडता येत नाही. मुलांचे खेळ, व्यायाम, मनोरंजन हे बंद पडले आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे मोबाईलचा वापर भरमसाठ वाढला आहे. त्यामुळे, मुलांचे मन स्वास्थसुद्धा बिघडत चालले आहे. मुलांच्या शारीरिक-मानसिक आरोग्यासाठी ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्रातर्फे मुलांसाठी विनामूल्य योगवर्गाचे आयोजन केल्याची त्यांनी दिली. मुलांसाठी लवकरच दररोज सकाळी सहा ते सात दरम्यान ऑनलाइन योगवर्ग सुरू होत असून, आठ ते सोळा वयोगटातील मुलामुलींना सहभागी होता येईल. त्यासाठी ७३५०३११४४५ या क्रमांकावर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.