Yoga To Improve Posture | मलायका अरोराच्या ट्रेनरने शेयर केल्या ‘बॉडी पोश्चर’ सुधारण्याच्या टिप्स, तुम्ही सुद्धा करू शकता फॉलो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Yoga To Improve Posture | योगामुळे अनेक आरोग्यदायी फायदे होतात. मन आणि शरीर ठिक करण्यापासून ते योग्य झोपे येण्यापर्यंत, योगतज्ञ रोजच्या फिटनेस रूटीनमध्ये योगा (Yoga) चा समावेश करण्याची शिफारस करतात. योगामुळे सांधे आणि स्नायूंची स्थिरता वाढून शरीर बळकट होण्यास मदत होते. योगामुळे शरीराचा बॅलन्स आणि पूर्ण बॉडी पोश्चर सुधारण्यास मदत होते (Yoga To Improve Posture).

 

मलायका अरोरा (Malaika Arora) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) सारख्या बॉलिवूड सेलिब्रिटी अनेकदा योगाच्या फायद्यांविषयी बोलताना दिसतात. मलायका अरोराचा ट्रेनर (Malaika Arora’s Trainer) सर्वेश शशी (Sarvesh Shashi) नियमितपणे त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर फिटनेस आणि योगाशी संबंधित माहिती शेअर करत असतो. नुकताच सर्वेशने एक व्हिडीओ शेअर केला असून शरीराचे पोश्चर सुधारण्याचे महत्त्व सांगितले आहे. (Yoga To Improve Posture)

तो म्हणतो की चुकीचे पोश्चर मान, पाठ आणि खांद्याची स्थिती खराब करू शकते. कधीकधी यामुळे डिप्रेशन आणि दुःखाची भावना देखील वाढते. चांगले पोश्चर आत्मसन्मान सुधारते, ऊर्जा वाढवते, दुखापतीचा धोका कमी करते आणि शरीरात रक्त प्रवाह सुधारते. सर्वेशने पुढे तीन योगासनांची माहिती दिली जी शरीराचे चांगले पोश्चर तयार करण्यात मदत करतात. ते तीन योग म्हणजे –

१. शोल्डर स्टँड
२. रिव्हॉल्व्ह चेअर पोज
३. टायगर पोज

 

सर्वेशने शेयर केलेल्या आसनांमुळे अनेक आरोग्य फायदे होतात.
शोल्डर स्टँड थायरॉईड, प्रोस्टेट आणि पोटाच्या ग्रंथींना उत्तेजित करण्यास मदत करते.
हे पाय आणि हिप्स टोनिंग आणि पचन सुधारण्यास मदत करते.

 

दुसरीकडे, रिवाईज्ड चेअर पोज, घोटे, मांड्या, ग्लूट्स आणि हिप फ्लेक्सर्स मजबूत करण्यास मदत करते.
हे खांद्यांची लवचिकता वाढवण्यास आणि अंतर्गत अवयवांना मालिश करण्यास मदत करते.
टायगर पोज पाठीचे मसल्स ताणण्यास मदत करते आणि कोअर बॉडी मजबूत करते.

 

Web Title :- Yoga To Improve Posture | yoga to correct posture malaika arora trainer shared tips to improve bad body posture

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chhagan Bhujbal | पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे छगन भुजबळांची मोठी मागणी; म्हणाले…

Vaani Kapoor | पुन्हा एकदा वाणी कपूरच्या बोल्ड अवताराने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

Maharashtra ATS | पंजाबमधील गँगस्टर, दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ रिंदा व सोनू खत्री गँगमधील 3 आरोपींना महाराष्ट्र एटीएसकडून अटक