Yogi Adityanath-Mohan Bhagwat | सरसंघचालक मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथांची बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!

नवी दिल्ली : Yogi Adityanath-Mohan Bhagwat | लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) बहुमताच्या आकड्यापर्यंत देखील पोहोचता आलेले नाही. या अपयशानंतर सरसंघचालकांसह संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरने पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपला कठोर शब्दात आरसा दाखवला आहे. त्यातच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी हालचाली सुरू आहेत. अशावेळी सरसंघचालक मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांची बंद दाराआड चर्चा झाल्याचे वृत्त समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सरसंघचालक मोहन भागवत उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून त्यांनी शनिवारी योगी आदित्यनाथ यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. या बैठकीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. द इंडियन एक्सप्रेसने सुत्रांच्या हवाल्याने या भेटीचे वृत्त दिले आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे की, सरसंघचालक मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात शनिवारी दोन वेळा भेट झाली. सकाळी मोहन भागवत हे संघाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गोरखपूर येथील कैपियरगंज येथे असताना येथे मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांची पहिली भेट झाली.

या बैठकीनंतर योगी आदित्यनाथ हे पुन्हा गोरखरपूरमधील पक्कीबाग येथील एका शाळेत मोहन भागवत यांना भेटले.
यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड जवळापास ३० मिनिटे चर्चा झाली.

भाजपाच्या वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार मोहन भागवत यांनी गोरखपूरमध्ये
येऊन योगी आदित्यनाथ यांची घेतलेली भेट ही समान्य भेट नव्हती. दरम्यान, या भेटीकडे आता अनेक अर्थांनी बघितले जात आहे.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda)
यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे संघात नाराजी असल्याचे वृत्त आहे.
आता भाजपला संघाची गरज नसून भाजप सक्षम आहे, असे नड्डा यांनी म्हटले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Swatantra Veer Savarkar Foundation | स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन च्या वतीने ’10 वी नंतर करिअर गाईडन्स’ संपन्न

Katraj Chowk Accident News | कात्रज चौकात एसटीच्या चाकाखाली येऊन तरुणीचा मृत्यू

Ayushman Bharat Yojana | आयुष्मान कार्डवर हॉस्पिटलने मोफत उपचार करण्यास दिला नकार, तर फिरवा ‘हा’ नंबर, समस्‍या ताबडतोब लागेल मार्गी

Ravindra Waikar | रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाने वापरला EVM अनलॉक करणारा फोन ; तपासातून खळबळजनक माहिती समोर