वाहन क्षेत्रातील मंदीमुळं चारचाकी गाड्यांवर मोठा ‘डिस्काऊंट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाहन क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे वाहनांच्या विक्रीत घट झाल्याचे दिसत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि विक्री वाढविण्यासाठी आता वाहन निर्माता कंपन्यांनी मोटारीवरील सवलतीत वाढ केली आहे. मंदीमुळे वाहनांची विक्री वाढविण्यासाठी आता मारुती सुझुकी, होंडा, ह्युंदाईसह अनेक कंपन्या त्यांच्या मोटारींवर 60 हजार ते 90 हजार रुपयांपर्यंत सवलती देत आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विफ्ट डिजायर, मारुती मोटार सुझुकीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मोटारींपैकी एक आहे. मंदीमुळे विक्रीवर परिणाम झाल्याने मारुती कारवर 74,105 रुपयांपर्यंत सवलत मिळणार आहे. यात 49,105 रुपयांची रोख सूट आणि 25,000 रुपयांच्या इतर सवलती मिळणार आहेत. शिवाय विनिमय लाभ, विनामूल्य विमा, विनामूल्य उपकरणांचा समावेश अशा सवलतीही मिळणार आहेत.

देशात इलेक्ट्रिक, हायब्रीड आणि सीएनजी वाहनांच्या अनुदानामुळे डिझेल वाहनांची विक्री कमी झाली आहे. यामुळे कंपनी या कारवर 67,796 रुपयांची सवलत देत असून यात 42,736 रुपयांची रोख सूट आणि 25 हजार रुपयांची विषेश सूट देण्यात आली आहे. मारुती सुझुकी सियाझच्या विक्रीवर 70 हजार रुपयांची सवलत देत आहे. यात 40 हजार रुपयांची रोख सवलत आणि 30 हजार रुपयांच्या इतर सवलतींचा समावेश आहे. ह्युंदाई मोटर्स आपल्या सर्वाधिक पसंतीच्या कार आय 10 वर 95 हजार रुपयांची सवलत देणार असून यात 60 हजार रुपयांची रोख सवलत आणि 35 हजार रुपयांच्या इतर सवलतींचा समावेश आहे.

होंडा मोटर्सने फ्लॅगशिप सेडान कार होंडा अमेझची विक्री वाढविण्यासाठी 60 हजार रुपयांपर्यंत सूट जाहीर केली आहे. यात 40 हजार रुपयांची रोख सवलत आणि 20 हजार रुपयांच्या इतर सवलती असतील. होंडा मोटर्स होंडा सिटी या दुसर्‍या लोकप्रिय कारवर 60 हजार रुपयांची सूट देत आहे. यात 40 हजार रुपयांची रोकड सवलत आणि 20 हजार रुपयांच्या इतर सवलतींचा समावेश आहे. हे सर्व सूट डीलरच्यानुसार बदलू शकते.

आरोग्यविषयक वृत्त –