Coronavirus Vaccine : ‘कोरोना’ वॅक्सीनच्या ट्रायलमध्ये तुम्ही देखील होवू शकता ‘सामील’, पूर्ण कराव्या लागतील ‘या’ अटी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या संपूर्ण जगाचं लक्ष कोरोनाच्या लसीकडे आहे. लस कधी येणार, कोणाला आधी मिळणार, सरकार सर्वात आधी कोणाला ही लस देणार? हे असे प्रश्न आहेत ज्याचं उत्तर प्रत्येकजण शोधत आहे. जगात सध्या 160 पेक्षा अधिक लसीवर काम सुरु आहे. यापैकी 30 लसी अशा आहेत ज्यांच्यावर ,क्लीनिकल ट्रायल सुरु आहे. हे ट्रायल माणसांवर केले जात आहे का, यात कोण सहभागी आहेत, असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. आता तुम्ही देखील या ट्रायलमध्ये सहभागी होऊ शकता. या तर जाणून घ्या कशा प्रकारे तुम्ही यामध्ये सहभागी होऊ शकता..

भारतात 3 वॅक्सीनचे क्लिनिकल ट्रायल सुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर बोलत असताना माहिती दिली की, सध्या देशात तीन वॅक्सीनचे क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. भारत बायोटेक, जायडस केडिला आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाची एस्ट्राजेनेका या वॅक्सीनवर सध्या ट्रायल सुरु आहे. भारत बायोटेक, जायडस केडिला यांचे पहिल्या टप्प्यातील ट्रायल सुरु आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एस्ट्राजेनेका या वॅक्सीनवर सध्या तिसऱ्या टप्प्यात ट्रायल सुरु आहे.पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात जवळजवळ 1000 लोकांवर ट्रायल केलं जातं आणि तिसऱ्या टप्प्यात 2500-3000 लोकांवर हे ट्रायल केलं जातं.

ट्रायल मध्ये सहभागी होण्यासाठी नियम व अटी

1. ट्रायलबद्दल माहिती : क्लिनिकल ट्रायल मध्ये लोकांना सहभागी करून घेण्यासाठी टीव्ही, वर्तमानपत्र यामध्ये याबाबतची माहिती दिली जाते. यामध्ये जो आधी येईल त्याला संधी मिळते.

2. निरोगी असणे गरजेचे : कोरोना वॅक्सीनच्या क्लिनिकल ट्रायल मध्ये सहभागी होण्यासाठी ती व्यक्ती निरोगी असणे गरजेचे आहे.

3. वय : 18 ते 55 या वयोगटातील व्यक्तींनाच यामध्ये सहभागी केलं जातं.

4. हे आजार असू नये : हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीज असणारे लोक यामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत.

5. कोरोना टेस्ट : ट्रायल मध्ये सहभागी होण्याआधी त्या व्यक्तीची कोरोना टेस्ट केली जाते.कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली तरच त्याची पुढील टेस्ट केली जाते.

6. अन्य काही टेस्ट : ब्लड शुगर टेस्ट, लिव्हर, किडनी, हेपेटायटीस बी, एचआयव्ही अशा अनेक टेस्ट केल्या जातात.

7. वॅक्सीन दिल्यानंतर : ट्रायल सूरु असताना व्हॉलंटियरला डोस दिल्यानंतर दर आठवड्याला किंवा 10 दिवसांनी तपासणीसाठी बोलवले जाते.

8. यासाठी पैसे मिळतात का? : ट्रायलसाठी कोणालाही पैसे दिले जात नाहीत. पण जर ट्रायल दरम्यान कोणाला काही दुखापत झाली तर त्याची भरपाई देण्यात येते.