ऑनलाइन फसवणूक : फोन करणार्‍याने विचारले – Phone Pay वापरता की Google Pay, नंतर अकाउंट झाले रिकामे

हांसी : वृत्तसंस्था – ऑनलाइन फसवणुक करून लोकांची बँक खाती लुटण्याची विचित्र प्रकरणे स÷धा मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागली आहेत. सायबर गुन्हेगार खातेधारकांना कोणतीही चाहूल लागू न देता त्यांची खाती रिकामी करत आहेत. हे आश्चर्यकारक आहे की, या सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहण्यात पोलिसांना यश येताना दिसत नाही. ज्यामुळे सायबर गुन्हेगार दररोज अनेक खातेधारकांना शिकार बनवून त्यांच्या घामाकष्टाची कमाई हडप करत आहेत.

बँक खात्यात ऑनलाइन फसवणूकीचा आणखी एक प्रकार सुलतानपूर गावात राहणार्‍या अनिल यांच्या बाबतीत घडला आहे. अनिल यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 12 डिसेंबरला दोन वेगवेगळ्या बँकेतील त्यांच्या खात्यातून तसेच त्यांच्या पत्नीच्या खात्यातून सायबर गुन्हेगारांनी 32 हजार रूपये काढले.

अनिल कुमार यांनी सांगितले की, त्यांना एका व्यक्तीचा फोन आला आणि तो म्हणाला मी तुमचा काका बोलत आहे, तुम्ही फोन-पे वापरता की गुगल-पे. अनिल कुमार यांनी उत्तर दिले की, तुम्ही ज्या नंबरवर फोन केला आहे, त्याच नंबरवर फोन-पे आणि गुगल-पे वापरतो.

अनिल कुमार यांनी तक्रारीत म्हटले आहे की, जेव्हा त्यांना संशय आला तेव्हा त्या अज्ञात व्यक्तीने फोन कट केला आणि त्यांनतर त्यांच्या हरियाणा ग्रामीण बँकेच्या खात्यातून 25 हजार रूपये, एचडीएफसी बँक खात्यातून अडीच हजार रूपये तसेच त्यांच्या पत्नीच्या हरियाणा ग्रामीण बँकेच्या खात्यातून चार हजार रूपये रोख रक्कम काढली गेली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.