बेपत्ता ‘आयटी इंजिनियर’ तरुणीचा लोणावळ्यातील दरीत सापडला मृतदेह

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – लोणावळा येथील लायन्स पॉइंटच्या 300 फूट खोल दरीत एका तरूणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अलिजा राणा (वय-24 रा. हैदराबाद) असे या तरुणाचे नाव आहे. 12 सप्टेंबर रोजी अलिजाची पर्स एका दगडाच्या कठड्यावर पोलिसांना सापडली होती. अलिजा हिने आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शिवदुर्ग रेस्क्यू टीम मागील तीन दिवसांपासून तिचा शोध घेत होते. अखेर आज तिचा मृतदेह आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, अलिजा राणा ही हिंजवडी येथील कंपनीत इंजीनियर म्हणून काम करत होती. गणेश विसर्जनादिवशी ती हिंजवडीतून बेपत्ता झाली होती. तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार हिंजवडी पोलीस ठाण्यात दखल करण्यात आली होती. आज तिचा मृतदेह लोणावळा येथील लायन्स पॉइंटच्या खोल दरीत 300 फुटावर आढळून आला आहे.

शिवदुर्ग रेस्क्यू टीम मागील तीन दिवसांपासून अलिजाचा शोध घेत होती. अखेर लायन्स पॉइंटच्या खोल दरीत 300 फुटावर आज (रविवार) तिचा मृतदेह आढळून आला. दोरीच्या सहाय्याने मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

या मोहिमेमध्ये आनंद गावडे, चंद्रकांत गाडे, राजेंद्र कडु, वैष्णवी भांगरे, विकास मावकर, दुर्वेश साठे, राहुल देशमुख, प्रविण ढोकळे, सनी कडु, निकेत तेलंगे,अशोक उंबरे, महेश मसने, अभी बोरकर, अनिल आंद्रे, शुभम आंद्रे, अंकुश महाडीक, प्रणय अंबुरे, वैभव शेलार, अजय शेलार, प्रविण देशमुख, ओंकार पडवळ, कपिल दळवी,योगेश अंभोरे, अमोल परचंड, चंद्रकांत बोंबले, अनिकेत आंबेकर, प्रिन्स बैठा, हर्ष तोंडे रोहित वर्तक, समीर जोशी, सुनील गायकवाड यांनी सहभाग घेऊन मृतदेह बाहेर काढला.

You might also like