ओळखीच्या तरुणांकडून पिंपरी-चिंचवड मध्ये तरुणीचा विनयभंग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड च्या मोशीमध्ये एका तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे.ओळखीच्याच तरुणांनी पाठलाग करून छेडछाड केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा भोसरी एम.आय.डी.सी.पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अठरा वर्षीय तरुणीने भोसरी एम.आय.डी.सी.पोलिसात फिर्याद दिली आहे.सर्यभान मुक्तार शेख (वय-२३ रा.मोशी) आणि कृष्णा धोतरे अस संशयित आरोपींची नावे आहेत.त्यानुसार भोसरी एम.आय.डी.सी.पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,संबंधित तरुणी ही संशयित आरोपींच्या ओळखीची आहे.परंतु गेल्या काही दिवसांपासून सूर्यभान आणि कृष्णा हे दोघे जण तरुणीच्या राहत्या घराच्या समोर येऊन अश्लील हावभाव करत होते.त्याचबरोबर तरुणीचा पाठलाग करून तिला वाईट नजरेने पाहात होते.हातवारे करून तिला खुनवायचे म्हणून तरुणीने दोघांच्या विरोधात भोसरी एम.आय.डी.सी.पोलिसात फिर्याद दिली आहे.त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास भोसरी एम.आय.डी.सी.पोलिसात  करत आहेत.