अंगावरचे सगळे कपडे काढून विदेशी महिलेची नदीत उडी, ‘जिगरबाज’ पोलिसानं अथक प्रयत्न करून वाचवलं

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील द्रव्यवती नदीमध्ये एका विदेशी महिलेने अचानक उडी मारल्याची घटना घडली आहे. या महिलेने नदीत उडी मारलेली पाहून उपस्थित लोकांनी पोलसांना माहिती देत त्यांना बोलावून घेतले. पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला वाचवले आहे.

घटनेच्या काही काळापूर्वी ही महिला नदीच्या काठी चालत होती. अचानक मुलीने आपले कपडे काढून नदीत उडी मारली. मुलगी पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहू लागली. नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. तेव्हा नदीच्या पाण्यावर या मुलीच्या डोक्याचे केस दिसले. त्यानंतर पोलिस स्टेशनचे एसएचओ सुरेंद्र यादव यांनी कोणताही विचार न करता पाण्यात उडी घेतली. सोबत कॉन्स्टेबल गणेश यांनीही पाण्यात उडी घेतली. बरीच मेहनत घेतल्यानंतर मुलीला पाण्यातून बाहेर काढण्यात त्यांना यश आले.

सुरेंद्र यादव जेव्हा महिलेला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते तेव्हा ती त्यांना विरोध करत होती. ती बाहेर येण्यास तयार नव्हती. मात्र तेथील लोकांनीही तिला बाहेर काढण्यासाठी पोलीसांची मदत केली. बाहेर आल्यानंतरही ती महिला पुन्हा नदीत उडी मारण्याचा प्रयत्न करीत होती. त्यामुळे सर्वच आश्चर्य व्यक्त करत होते.

दरम्यान, मध्य प्रदेशात झालेल्या संततधार पावसामुळे मानवी जीवन हे पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पाऊस, नद्या, नाले आणि तलावांमध्ये बुडल्याने आतापर्यंत राज्यात ३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच पावसाच्या कहरानंतर जनजीवनावर गंभीर परिणाम झाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त