सावधान ! … म्हणून स्विगी, झोमॅटोवरील ऑर्डर होणार महाग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण अनेकदा ऑनलाइन कंपन्यांकडून ऑनलाइन फूड ऑर्डर करतो. परंतू आता याच ऑनलाइन फूड एग्रीगेटर्स कंपन्या अनेक खाद्यपदार्थांवर हॉटेलमधील दरापेक्षा 5 रुपये ते 50 रुपये एवढी वाढ केली आहे. त्यामुळे ऑनलाइन फूड ऑर्डर करणाऱ्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.

ऑनलाइन फूड एग्रीगेटर्स आपल्या महसूलात वाढ करण्यासाठी देशभरातील आउटलेट्समधील खाद्यपदार्थोच्या ओरिजनल प्राइसमध्ये वाढ करणार आहे. काही पदार्थांत 5 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत अधिक महाग होणार आहे. विशेष म्हणजे अनेक ग्राहकांना याबद्दल महितीच नाही की ते जो पदार्थ ऑर्डर करत आहेत त्याच्या प्रिमीयमचे पैसे देत आहेत.

गुगलवर करा शहानिशा –
जर तुम्ही गुगलवर थोडी शहानिशा केली तर तुमच्या लक्षात येईल की, झोमॅटो वर देण्यात आलेल्या किंमतीत आणि हॉटेलच्या मेन्यू कार्डमधील दरात फरक आहे. परंतू जेव्हा ग्राहक वेबसाइटवर ऑर्डर ऑनलाइन या वर क्लिक करतो तेव्हा किंमतीमध्ये आपोआप वाढ होते.

म्हणून होते मेन्यूच्या दरात वाढ –
हॉटेलचे मालक डिलिवरी कंपन्याना काही प्रमाणात कमीशन देत असतात. ज्यामुळे दरात 15 – 35 रुपये वाढ होते. तर मोठ्या हॉटेलने एग्रीगेटर कंपन्याना ग्राहकांसाठी मेन्यूचे दर वाढवण्याची मान्यता दिली आहे. त्यामुळे हॉटेलच्या मालकांनी दर वाढवले की स्विगी आणि झोमॅटो सारख्या कंपन्या आपल्या दरात वाढ करतात.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक