चुलीत गेले नेते आणि चुलीत गेला पक्ष…

वडवणी (जि. बीड) : पोलीसनामा आॅनलाइन

सकल मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने अनेक मोर्चे काढले, निदर्शने केली, रास्ता रोको केले, तसेच काही जणांनी आत्महत्याही केल्या तरीही सरकार मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेत नाही. त्यामुळे जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत एकाही राजकिय पुढाऱ्याला गावात पाय ठेवू देणार नसल्याचा निर्णय कुप्पा ( ता. वडवणी, जि. बीड) येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. चुलीत गेलं राजकारण आणि चुलीत गेला पक्ष मराठा आरक्षण एकच लक्ष असा फलकच युवकांनी लावला आहे.

गावात एखादा राजकिय पुढारी आला आणि काही अनूचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी जबाबदार तो पुढारी राहिल. अशा प्रकारचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदार तसेच वडवणी पोलीस स्टेशनला दिले आहे. राजकिय पुढारी गावात न येऊ देण्याबाबत गावकऱ्यांनी चांगलाच ठोस निर्णय घेतल्याचे या फलकावरुन स्पष्ट होत आहे.

इंधन दरवाढी विरोधात ‘आरपीआय’ची निदर्शने

यावेळी बाबासाहेब भारस्कळ, दशरत सावंत, प्रकाश सावंत. डॉ. प्रविण सावंत, शामसुंदर सावंत, बाळासाहेब सावंत, गनेश सावंत, अजय सावंत, महेशराव सावंत, बंडू सावंत, वसंत वडचकर, रंजित सावंत.हनुमान काळे, हनुमान सावंत, अक्षय सावंत, सुशिल सावंत, दादासाहेब सावंत, सचिन मायराने, जगन्नाथ सावंत, राहुल सावंत, राजेश सावंत, सुमित सावंत, दत्ता कदम, संजय सावंत, योगेश सावंत यांनी फलकाचे शनिवारी (दि.8) अनावरण केले.

जाहिरात

जाहिरात

[amazon_link asins=’B014CLL3KS,B07437YHXP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d4c6e7e5-b379-11e8-8003-f7801834e76c’]