सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसचे ‘निषेधासन’

नांदेड : पोलीसनामा आॅनलाइन (माधव मेकेवाड) – केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ नांदेड जिल्हा व शहर युवक काँग्रेसतर्फे विविध ठिकाणी आंदोलने झाली. सकाळच्या सुमारास कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणांविरोधात निषेधासन केले.

शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन ३१ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास, युवक काँग्रेसच्या वतीने निषेधासन आंदोलन करण्यात आले. देवेंद्र फडणवीस सरकारने चार वर्षात जनतेला केवळ आश्वासन देली आहेत, चार वर्षात जनतेची केवळ दिशाभूल करण्याचे काम राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले असल्याचे सांगत, शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन ३१ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास, युवक काँग्रेसच्या वतीने निषेधासन आंदोलन करण्यात आले. सरकारच्या सामान्य नागरिकांविरोधी कामगिरीचा निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी महागाई आसन, राफेलासन, गजरासन, फसविणासन, धमकीआसन, मौनासन, बेरोजगारासन करत सरकारचा धिक्कार केला.

शरद पवार पंतप्रधान म्हटल्यावर १० सेकंदात गाढ झोप येईल – मुनगंटीवार यांची कडवी टीका 

या अभिनव आंदोलनात युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्यासह प्रदेश सचिव अतूल वाघ, दक्षिण विधानसभा अध्यक्ष अब्दुल गफार, उत्तर विधानसभा अध्यक्ष सत्यजीत भोसले, जेसिका शिंदे, बालाजी सुर्यवंशी, श्याम कोकाटे, सुरेश हाटकर, गोपी मुदिराज,  आदींसह अनेक युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.