शहरात दोन वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन – वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वाहतूकीचे नियमन करणाऱ्या दोन वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. डेक्कन आणि कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे तर एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली घटना डेक्कन येथील गुडलक चौकात रात्री आठच्या सुमारास घडली तर दुसरी घटना कोंढवा येथील साईबाबानगर येथे दुपारी एक वाजता घडली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9b8cb858-d1fa-11e8-9d5c-2bc1cb363d4a’]

मनिषा चंद्रकांत वायसे (वय-३०) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अक्षय जयसिंग जाधव (वय-२५ रा. निलसागर सोसायटी, बिबवेवाडी) याला अटक केली आहे. तर चंद्रभान बाळाजी सकपाळ यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. कोंढवा पोलिसांनी साकीब ताहीर सय्यद (वय-२२) याला अटक केली आहे तर त्याचा साथिदार अमन ताहीर सय्यद व इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

डेक्कन वाहतूक विभागाच्या महिला पोलीस नाईक मनिषा वायसे या मंगळवारी (दि.१६) रात्री आठच्या सुमारास गुडलक चौकातील सार्वजनीक रोडवर वाहतूकीचे नियमन करत होत्या. त्यावेळी आरोपी अक्षय जादव हा सिग्नल तोडून भरधाव वेगात जात होता. त्याला अडवून त्याच्यावर कारवाई करत असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील वाहन मनिषा वायसे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. आरोपीला वाहतूक नियमांची माहिती देत असताना आरोपीने त्यांच्यासोबत हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. मनिषा वायसे यांच्या फिर्य़ादेवरुन आरोपीला डक्कन पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास डेक्कन पोलीस करीत आहेत.

तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा

दुसऱ्या घटनेत कोंढवा वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार चंद्रभान सकपाळ हे साईबाबानगर येथील शितल पेट्रोल पंपासमोर वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी आरोपी साकीब सय्यद हा त्याच्या दुचाकीवरुन मोबाईलवर बोलत जात होता. सकपाळ यांनी त्याला थांबवून गाडीच्या कागद पत्रांची मागणी केली. त्यावेळी त्याने इतर आरोपींना बोलवून हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसेच आरोपीने सकपाळ यांना धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास कोंढवा पोलीस करित आहेत.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ac0aad20-d1fa-11e8-a6b7-212fc3387bc9′]