खूशखबर ! YSR च्या मोफत पीक विमा अंतर्गत 9 लाखाहून अधिक शेतकर्‍यांच्या खात्यात 1252 कोटी जमा

पोलीसनामा ऑनलाईन : आंध्र प्रदेशचे सीएम वाईएस एस जगन मोहन रेड्डी यांनी वायएसआर मोफत पीक विमा योजनेंतर्गत (YSR Free Crop Insurance) 9 लाखाहून अधिक शेतकर्‍यांच्या खात्यात 1,252 कोटी रुपये जमा केले आहेत. 2019 मध्ये ज्यांच्यी पीकांचे नूकसान झाले होते, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरकारने कठीण काळात शेतकऱ्यांना आधार देण्याची जबाबदारी घेतली आहे. शेतकऱ्यांना विम्याच्या हप्त्यातून मुक्त होण्यासाठी सरकारने विनामूल्य पीक विमा योजना सुरू केली आहे. आधीच्या सरकारमध्ये विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचा वाटा द्यावा लागत होता.

या नवीन योजनेत शेतकऱ्यांना त्यांचा वाटा देण्याची गरज नाही. सरकारने संपूर्ण रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला आहे आणि शेतकऱ्यांच्या वतीने विमा प्रीमियम भरला आहे. सीएम रेड्डी म्हणाले की, 2016 ते 2019 दरम्यानच्या 3 वर्षात मागील सरकारने विमा हप्त्यासाठी सरासरी 393 कोटी रुपये खर्च केले आणि शेतकर्‍यांनी वर्षाकाठी सुमारे 290 कोटी रुपये भरले. पूर्वीच्या टीडीपी सरकारमध्ये त्याचवेळी 20 लाख शेतकरी नोंदणीकृत होते. आमच्या सरकारमध्ये सुमारे 49.80 लाख शेतकर्‍यांना विमा संरक्षणात आणले गेले आहे. राज्य सरकारने 2019-20 या वर्षात प्रीमियमसाठी 971 कोटी रुपये देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पिकांचा विमा ऐच्छिक आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान वाचवण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना (पीएमएफबीवाय) सुरू केली. ही योजना 13 जानेवारी 2016 रोजी सुरू करण्यात आली होती. पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत. ज्या शेतकऱ्यांना वाटते की, त्यांच्या पिकांना धोका असू शकतो, मग ते आपल्या पिकाचा विमा काढू शकतात.