आमचं नवीन वर्षे म्हणजे गुढी पाडवा आणि  शिवजयंती असे म्हणणारे अचानक बदलले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आमचं नवीन वर्षे म्हणजे गुढी पाडवा आणि  शिवजयंती असे म्हणणारे अचानक बदलले दिसून येत आहेत . शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ( नव वर्षानिमित्त ) ३१ डिसेंबरला शहरातील बाजारपेठा २४ तास सुरू ठेवा अशी ,  मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले कि, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि  पुणे या शहरांच्या अनिवासी भागातील बाजारपेठा २४ तास सुरू ठेवण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.  शहरांच्या अनिवासी भागातील आणि मिलच्या जमिनीवरील दुकाने, मॉल, हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. यामुळे राज्याच्या महसूलात वाढ होईल, शिवाय रोजगारही उपलब्ध होतील.

दिवसा कायदेशीर सुरु असेलेली हॉटेल, मॉल हे  रात्री बेकायदेशीर कशी ठरू शकतात, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मॉल, मिल कंपाउंडमधील बाजारपेठा २४ तास सुरू ठेवल्यामुळे लोकांना नव्यावर्षाचा मनसोक्त आनंद घेता येईल,’ असंही आदित्य यांनी पत्रात म्हटलं आहे.

या पूर्वी मुंबई महापालिकेने २०१३ मध्ये मुंबईतील दुकाने, हॉटेल्स २४ तास सुरू ठेवावीत, असा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र या प्रस्तावाला २०१५ मध्ये मुंबई पोलिसांनी मान्यता दिली असून सध्या हा प्रस्ताव राज्याच्या गृहखात्याकडे मंजुरीसाठी आला आहे. त्या मुळे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.