…तर छिंदमला दोन पोलिसांचे संरक्षण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीकांत छिंदमचा पोलीस संरक्षणाचा अर्ज वरिष्ठांकडे पाठवण्यात आलेला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर आणि शुल्क भरल्यानंतर २ पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त देण्यात येईल, असे तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी सांगितले आहे.

महानगरपालिकेत कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने आणि आतापर्यंत कोणत्याही पक्षाने एकत्र महापौर पदाच्या निवडणुकीत ऐनवेळी काहीही राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनही सज्ज झाले असून महानगरपालिकेबाहेर मोठा पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

महानगरपालिकेची इमारत ही नगर-औरंगाबाद महामार्गालगत असल्याने सकाळी ९ ते २ या वेळेत या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे. येथे जड व हलकी अशा सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. महानगरपालिका परिसरात तसेच शहरातील महत्त्वाच्या भागात आणि विविध ठिकाणी पोलिसांनी ‘फिक्स पॉईंट’ तयार केले आहेत. सर्व ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या बंदोबस्तासाठी २ पोलीस उपधीक्षक, ६ पोलीस निरीक्षक, २४ सहायक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक आणि ३२५ पोलीस कर्मचारी असा मोठा पोलिस फौजफाटा सज्ज असणार आहे.