निरोपाच्या सामन्यावर युवराजचे उत्तर, म्हणाला बीसीसीआयकडून मेहरबानीची अपेक्षा नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा दिग्गज क्रिक्रेटपटू युवराज सिंह यांने नुकतीच आपल्या निवृत्तीची घोषणा करत आपल्या चाहत्यांना धक्का दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला त्यांने रामराम ठोकला असला तरी त्यांनी बॅट २०-२० मध्ये अजूनही तळपणार आहे. परंतू आंतरराष्ट्रीय क्रिेकेट मधून निवृत्ती घेत असल्याने तो अत्यंत भावूक झाल्याचे पहायला मिळाले. निवृत्तीची निर्णय घेणे हे माझ्यासाठी अत्यंत कठीण असल्याचे सांगत त्याने आपल्या कुटूंबाशी आणि आजी माजी क्रिकेट सहकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय आपण घेतल्याचे त्याने सांगितले.

सचिन तेंडुलकर ज्या प्रकारे शेवटचा सामना मुंबईच्या मैदानावर खेळला, त्याप्रमाणे तुला शेवटचा सामना स्वतःच्या आवडत्या मैदानावर खेळावासा वाटला नाही का? किंवा तू BCCI ला या बाबतची विनंती केली नाहीस का? या प्रश्नाला युवराजने सडेतोड उत्तर दिले. तो म्हणाला मला अशा प्रकारचे क्रिकेट आवडत नाही. मी कधीच कोणाकडे माझ्या निरोपाचा सामना खेळण्याचा हट्ट धरला नाही.

यावर पुढे पत्रकारांशी संवाद साधताना युवराज म्हणाला, मी यो-यो टेस्ट पास झालो नाही, तर मला निरोपाचा सामना खेळायला मिळेल आणि त्यानंतर मला निवृत्त व्हावे लागेल, असे मला सांगण्यात आले होते. मात्र ती पद्धतच मला मान्य नाही, मला त्या पद्धतीचा निरोप कधीही नको होता. म्हणून मी स्पष्टपणे सांगितले की जर मी यो-यो टेस्ट पास झालो नाही, तर मला कोणी सांगण्याआधी मी स्वत: घरी निघून जाईन आणि निवृत्ती घेईल.

युवराजला क्रिकेट खेळण्यास त्याच्या वडीलांनी क्रिकेट खेळण्याचे प्रोत्साहन दिले. यावेळी युवराजला निवृत्ती बद्दलचे मत विचारले असता तो म्हणाला की, मी माझ्या वडिलांमुळे क्रिकेटमध्ये आलो, ते स्वतः उत्तम क्रिकेटर आहेत, त्यांना क्रिकेटचा विश्वकप उंचवता आला नाही. ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिले आणि मी त्यांचे स्वप्न पुर्ण करु शकलो, २००७ च्या टी-२० विश्वचषकात आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विश्वकप जिंकवून देण्यात माझा मोलाचा वाटा राहिला.

आरोग्यविषयक वृत्त –

अंघोळ करताना तुम्ही ‘या’ चूका तर करत नाही ना ?

‘या’ आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर

गरोदरपणा नंतरचा लठ्ठपणा नको ? मग ‘हे’ पाणी प्या

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती