प्रकाश आंबेडकरांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी : सकल मराठी समाज

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

सकल मराठी समाजाच्या वतीने दिनांक ५ जुलै रोजी घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु प्रकाश आंबेडकर जर नक्षलवादी असतील तर होय मी नक्षलवादी आहे असे अनोखे उपरोधक आंदोलन करण्यात आले होते. पोलिस सह आयुक्त श्री रविंद्र कदम यांनी यल्गार परिषद आयोजक व परिषदेत उपस्थित असलेले मान्यवर यांचेवर नक्षलवादाशी संबधाचा आरोप केला होता. त्याच अनुषंगाने सदर आंदोलन सरकारला जाब विचारण्यासाठी व प्रबोधनासाठी करण्यात आले होते.
[amazon_link asins=’B077PWK5QD’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9177683c-97fa-11e8-9717-7f58a12dc81b’]

नुकतेच पोलिस सह आयुक्त यांची नागपुर शहरात बदली झाली असुन पुण्यातील एका निरोप सभारंभाच्या कार्यक्रमात कदम साहेबांनी यल्गार परिषदेचा व भिमा कोरेगाव हल्ल्याचा काहिही संबध नसुन प्रकाश आंबेडकर यांचे वरिल केलेले आरोप पुर्णतः तथ्यहिन असल्याचे जाहिर केले.सकल मराठी समाजाच्या वतीने या संदर्भात केलेल्या आंदोलनाचा हा प्रबोधनकारक परिणाम आहे.

परंतु त्या आरोपामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या सुरक्षततेचा मुद्दा समोर आला असुन त्या दृष्टीकोनातुन आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ प्रकाश आंबेडकर यांना शासनाने त्वरित झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात यावी तसेच सदर होय मी नक्षलवादी आहे या आंदोलनाचा परिणाम म्हणुन पोलिस प्रशासनाने सत्य परिस्थिती कबुल करुन एक प्रकारे सकल मराठी समाजाच्या पाठपुराव्याची हे घवघवित यश आहे अशी भावना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन संघटनेच्या वतीने समन्वयक राजेश खडके, जेष्ठ नेते मुरलीधर जाधव,महाराट्र क्रांती सेनेचे मारुती भालेराव,मानवी हक्क सुरक्षा महासंघाचे अशोक माने,भिमसाम्राज्य संघटनेचे गणेश भोसले,भारिप बहुजन महासंघाचे गणेश जाधव, दिलीप गायकवाड,अक्षय तायडे तसेच कबिर विचार मंचाचे शरद गायकवाड इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.