अनुष्का शर्माच्या पोस्टवर झरीन खाननं दिली ‘ही’ प्रतिक्रिया !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सलमान खानच्य ‘वीर’ चित्रपटून बॉलीवूडमध्ये पाऊल टाकणारी अभिनेत्री जरीन खान नुकतीच एका फोटोवरून सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. या फोटोमध्ये झरीन राजस्थानातील पिछोला तलावाजवळ उभी होती. या फोटोत तिचे स्ट्रेच मार्क दिसत होते त्यामुळे अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले. हे पाहून अभिनेत्री अनुष्का शर्मा झरीनच्या मदतीला धावून आली आणि झरीनला सपोर्ट केले.

अनुष्का शर्मा ने आपल्या अकाऊंटवरून झरीनचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, जरीन तू एक सुंदर, निडर आणि मजबूत व्यक्तिमत्व आहेस आणि तू आहे त्यातच खूप परफेक्ट आहेस. अशा पद्दतीने अनुष्काने ट्रोलर्सला चांगलेच उत्तर दिले आहे. त्यावर झरीन म्हणते जे लोक हे जाणून घेण्यासाठी इच्छुक आहेत की माझ्या पोटासोबत हे काय झाले आहे तर मी त्यांना सांगू इच्छिते हे तेच पोट आहे ज्याने नुकतेच ५० किलो वजन कमी केले आहे.

तसेच झरीन पुढे म्हणते जर तुम्ही यावर फोटोशॉप आणि कोणत्याच सर्जरीचा वापर केला नाही तर ते असे दिसते. मी पहिल्यापासूनच अशी आहे मी माझ्या चुकीच्या गोष्टींना आत्मसात करते ना की त्यांना लपवण्याचा प्रयत्न. झरीन खान ने नुकतेच आपले ५० किलो वजन कमी केले आहे. त्यामुळे तिच्या पोटावर स्क्रॅच आले होते त्यामुळे ती नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनली होती.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like