Zika Virus | पुणे जिल्ह्यातील झिका नियंत्रणात; केंद्रीय पथकाकडून पाहणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने अनेक लोक हतबल झाले आहेत. कोरोनासहित अनेक विषाणूने आपलं घर केलं आहे. त्यातच झिका या विषाणूचा (Zika Virus) संसर्ग अनेक भागात पसरत असल्याचे समोर आले आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील (Pune District) एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील पुरंदर (Purandar) तालुक्यातील झिका विषाणू (Zika virus) संसर्गाची परिस्थिती आता आटोक्यात आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य पथकांने (Central Health Squad) दिलीय. गुरुवारी (5 ऑगस्ट) रोजी पुरंदर येथील बेलसर (Belser) गावची भागाची केंद्रीय पथकाने (Central Health Squad) पाहणी केलीय. याबाबत माहिती पथकाचे प्रमुख डॉ. हिंमतसिंह पवार यांनी दिली आहे.

Zika Virus | zika under control in pune district central health squad

महाराष्ट्रातील (Maharashtra) प्रथम झिकाचा रुग्ण (Zika virus) संसर्गाची परिस्थिती आता आटोक्यात आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य पथकांने (Central Health Squad) दिलीय. गुरुवारी (5 ऑगस्ट) रोजी पुरंदर येथीबेलसर येथ सापडला होता. तेव्हापासून सरकार, आणि प्रशासनास चिंता लागून राहिली होती. या पार्श्वभूमीवर सर्वच आरोग्य यंत्रणा जोमात कामाला लागलीय. दरम्यान केंद्राच्या पथकाने येथील गावाच्या ग्रामपंचायतीने ही परिस्थिती संवेदनशील पद्धतीने हाताळली आहे. हे समाधानकारक असल्याचे मत देखील यावेळी केंद्रीय पथकाने (Central Health Squad) व्यक्त केले आहे.

केंद्रीय पथकाच्या प्राथमिक उपाययोजना काय?

– झिकाचा डास दिवसा चावतो, त्यामुळे पूर्ण कपडे वापरावेत

– शरीराला ओडोमाससारखे डास प्रतिबंधक मलम लावावेत

– गर्भवती व लहान मुलांनी आपापले डासांपासून संरक्षण करावे

– पाण्याची साठवणूक करू नये.

या आलेल्या झिकाच्या (Zika virus) संसर्गापासून गर्भवतींना अधिक धोका संभवतो. गर्भवती बाधित झाली तर तिच्यापासून बाळाला धोका पोहोचण्याची शक्यता असते. यामुळे जन्मणाऱ्या बाळाला मंदबुद्धीसारख्या आजाराचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. म्हणून गर्भवतींनी याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचं केंद्रीय पथकामधील सदस्या डॉ. नैन शिल्पी (Dr. Nain Shilpi) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

या दरम्यान, केंद्रीय आरोग्य बेलसर येथे ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या वतीने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेत असताना, या पथकामध्ये (Central Health Squad) डॉ. पवार, डॉ. नैन शिल्पी, राष्ट्रीय विषाणू संस्थेचे डॉ. मंगेश गोखले यांचा समावेश आहे. यांच्याबरोबर राज्य आरोग्य विभागातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. अजय बेंद्रे, राज्य आरोग्य विभागाचे डॉ.
महेंद्र जगताप, डॉ. प्रणील कांबळे आदी अधिकारी होते. दरम्यान, यावेळी आमदार संजय जगताप,
नंदकुमार जगताप, अमर माने, उज्ज्वला जाधव, डॉ. भरत शितोळे, डॉ. सागर डांगे, अर्जुन धेंडे,
धीरज जगताप, आर. एन. शेळके, नीलेश जगताप, कैलास जगताप आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा

Coronavirus in India | ऑगस्टमध्ये सातत्याने वाढत आहेत कोरोनाच्या नवीन केस, कालच्या तुलनेत 4 % वाढीसह आली सुमारे 45 हजार प्रकरणे

SBI ग्राहकांचा प्रश्न – खात्यात किती रुपये ठेवण्याची आवश्यकता? जाणून घ्या याचे योग्य उत्तर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Zika Virus | zika under control in pune district central health squad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update