‘इथं’ लोक ट्रॉलीमध्ये नोट भरून करतात ‘शॉपिंग’ ! महागाईमुळं ‘या’ देशाचे एकदम वाईट ‘हाल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झिम्बाब्वेचे माजी राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांचे सिंगापूरमधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. 95 वर्षीय मुगाबे ही मागील काही दिवसांपासून आजारी होते. ते 1980 ते 1987 पर्यंत देशाचे पंतप्रधान आणि 1987 पासून 2017 पर्यंत राष्ट्रपती होते. त्यांनी 37 वर्ष झिम्बाब्वेचे नेतृत्व केले. परंतू त्यांच्या कार्यकाळात झिब्माब्वेने अत्यंत वाईट परिस्थिती पाहिली आहे. मागील वर्षापर्यंत 24 तासात तेथे खाण्या-पिण्याचा वस्तूंच्या किंमती अचानक दुप्पट होत होत्या. या देशातील लोक नोटा बॅगेत भरुन दूध, भाज्या खरेदी करण्यासाठी जात होते. जर किराणा भरायचा असेल तर लोक ट्रॉलीभरुन पैसे घेऊन जात असे इतकी महागाई वाढली.

काही दिवसांपूर्वी झिम्बाब्वेतील लोक रस्त्यावर नोटांनी भरलेली ट्रॉली घेऊन खरेदीसाठी जात असल्याचे दिसत होते. महागाई वाढल्याने लोकांना छोट्याशा सामानासाठी जास्त पैसे मोजावे लागत होते.
zimbabwe
देशाकडे नाहीत आर्थिक धोरणे –
वर्ल्ड बँकच्या आवाहलानुसार, ही देशात आलेली दुसरी मोठी महागाई होती, येथे 24 तासात वस्तूंच्या किंमती दुप्पट होत असे. अर्थतज्ज्ञ सांगत आहे की या देशातील सरकारकडे योग्य धोरणे नव्हती. त्यावेळी सरकारने कोणत्याही नियोजनाशिवाय कितीही नोटा छापल्या, त्यामुळे लोकांकडे मोठ्याप्रमाणात पैसा जमा झाला. जास्त नोटा छापण्यापेक्षा सरकारने शेतकऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिले असते तर देशावर अशी वेळ आली नसती. येथे लोकांकडे पैसा तर आला परंतू खाण्या-पिण्याचे पदार्थ महाग झाले.

सरकारने छापल्या भरभरुन नोटा –
या देशात लोकांना गरीब म्हणण्यात येत होते, परंतू त्याच्याकडे करोडो रुपये होते. परंतू त्याचा फायदा होत नव्हता. कारण पैशाला किंमत नव्हती. त्यावेळी झिम्बाब्वे एक हजार लाख कोटी डॉलरची किंमत 5 अमेरिकी डॉलर एवढी होती. यामुळे चलनाची आणि महागाईची परिस्थिती लक्षात येते.

ज्यावेळी लोकांकडे पैसा नव्हता तेव्हा सरकारने नोटा छापत सूटले.
1980 पासून एप्रिल 2009 पर्यंत झिम्बाब्वेचे चलन जिम्बॉबवियन डॉलर होते. त्याआधी त्याचे चलन रोडेशिअन डॉलर होते. सध्या देशात अनेक देशांच्या चलनाचा वापर केला जात आहे, उदा. साऊथ अफ्रिकाचे रँड, जपानी येन, चीनचे युआन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका डॉलर यांचा वापर करण्यात येत आहे.

1999 – 2008 पर्यंत आर्थिक मंदी मोठी होती. त्यामुळे महागाईचा स्तर वाढला. एका आठवड्याच्या बसचे भाडे 100 ट्रिलियन डॉलरवर पोहले होते. 2009 मध्ये या देशाने आपले चलन सोडून अमेरिकी डॉलर आणि दक्षिण अफ्रिकी रँडचा वापर सुरु केला.