‘झोमॅटो’लाही चढलाय ELECTION FEVER ! कोण होणार PM सांगा आणि भरभक्कम कॅशबॅक मिळावा

नई दिल्ली : वृत्तसंस्था – रविवारी संध्याकाळी काही माध्यमं आणि एजन्सींनी एक्झिट पोल देऊन लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालांचे अंदाज वर्तवले आहेत. या एक्झिट पोल नुसार भाजप – शिवसेना महायुतीला सर्वाधिक जागा मिळणार असे सांगण्यात आले आहे. तसेच नरेंद्र मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधान होणार असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. या एक्झिट पोल नंतर मात्र देशभरात भाजप प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता ऑनलाईन फूड डिलेव्हरी करणारे लोकप्रिय संकेतस्थळ /अँप ‘झोमॅटो’ ने इलेक्शन फीव्हरमध्ये ग्राहकांसाठी खास ‘झोमॅटो’ इलेक्शन लीग ऑफर आणली आहे.

काय आहे ‘झोमॅटो’ इलेक्शन लीग ऑफर ?

झोमॅटोच्या या नव्या ‘झोमॅटो’ इलेक्शन लीग ऑफर’ नुसार तुम्हाला या संकेतस्थळावरून फूड ऑर्डर केल्यानंतर ग्राहकाला एक भविष्यवाणी करायची आहे. २३ तारखेच्या निकालानंतर कोण पंतप्रधान होणार ? याचि भविष्यवाणी करायची आहे. ही भविष्यवाणी जर खरी ठरली तर तुम्हाला ३०% अधिक कॅशबॅक मिळणार आहे. ही बंपर ऑफर कंपनीकडून जारी करण्यात आली आहे. कंपनीकडून सांगण्यात आले आहे की ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरवर ४० टक्के सूट दिली जाणार आहे.तसेच जर ग्राहकांनी पंतप्रधान पदाची भविष्यवाणी खरी ठरली तर त्यांना ३० % कॅशबॅक मिळणार आहे.

काय आहे कालावधी ? असा मिळणार कॅशबॅक

झोमॅटोच्या या ऑफरचा कालावधी २२ मे पर्यंत आहे. २२ तारखेपर्यंत म्हणजेच निकालाच्या आधी पंतप्रधान पदाची योग्य ती भविष्यवाणी करून ३०%कॅशबॅक ची संधी मिळवू शकता. याबाबत कंपनीने संगितले आहे की जेव्हा देशात नव्या पंतप्रधानांच्या नावाची घोषणा होईल तेव्हा अचूक उत्तर देणाऱ्या ग्राहकांच्या खात्यात आपोआप ३०% कॅशबॅक जमा होईल. कंपनीने ही देखील सांगितले आहे की, भारतातील २५० शहरांमध्ये ३ लाख २० हजार लोकांनी यात सहभाग घेतला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like