राज्यातील लिंगायत समाजाला आरक्षण देण्यात यावे : धनंजय मुंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
राज्यातील लिंगायत समाजाला कर्नाटक राज्याच्या संवैधानिक धर्तीवर आरक्षण देण्यात यावे, मात्र हे देताना सध्या असलेल्या इतर प्रवर्गाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात केली.

सभागृहात नियम २८९अन्वये मुंडे यांनी सभागृहात ही मागणी केली. कर्नाटक राज्य सरकारने लिंगायत समाजाला धर्माचा दर्जा देत असताना मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध आणि शिख समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाला धक्का न लावता लिंगायत समाजाला आरक्षण दिले पाहिजे, यासाठी आग्रही भूमिका मांडली. सरकारने ९ ते १४ ऑगस्ट २०१४मध्ये कराड येथील लिंगायत आंदोलनात सत्तेत आल्यावर मागण्या लवकरात लवकर सोडवू, असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले, असा सवाल मुंडे यांनी यावेळी केला. लिंगायत समाजाच्या विषयावर सभागृहात चर्चा व्हावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.