व्यावसायिकाची छातीत गोळी झाडून आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील एका व्यावसायिकाने अफिसच्या केबिनमध्येच छातीत गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार दुपारी तीन वाजता घडला. यामुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

अरविंद फाळके (55) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. फाळके यांची एक फायनान्स कंपनीन आहे. ते दुपारी ऑफिसमध्येआले. त्यांनी घरून आणलेला जेवणाचा डब्बा खाला. तसेच मी झोपतो असे म्हणून त्यांच्या कॅबिनमध्ये गेले. काही वेळातच त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. हडपसरमधील तुपे नाट्यगृह परिसरात ही घटना घडली आहे.