अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सोशल मिडीयाद्वारे दिलेले आदेश पाळणे बंधनकारक नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

माहिती अधिकारातून मागवलेल्या माहीतद्वारे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना व्हाट्सअप किंवा सोशल मिडीयाद्वारे दिलेले आदेश पाळणे बंधनकारक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

योगेश पालखे यांनी माहीती अधिकाराच्या अर्जाद्वारे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना व्हाट्सअप किंवा सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिलेले कार्यालयीन आदेश कर्मचाऱ्यांना पाळणे बंधनकारक असल्याबाबतचे धोरण किंवा परिपत्रकाची प्रत मिळावी अशी मागणी केली होती.

या अर्जाच्या अनुषंगाने कळविण्यात आले आहे की, शासनाचे आदेश किंवा शासन निर्णय व्हाटसअप किंवा सोशल मिडीयावर प्रसिद्ध करण्याबाबत तसेच अशाप्रकारचे सोशल मिडीयावरचे कार्यालयीन आदेश कर्मचाऱ्यांना पाळणे बंधनकारक असल्याबाबत कार्यालयाचे कोणतेही धोरण किंवा आदेश नाहीत.