आग विझवायला आलेला बंब जळून खाक

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन
दोंडाईचा मधील टाकरखेडा गावात उसाच्या शेताला काल आग लागली होती. ती विझवण्यास आलेल्या अग्निशामक दलाच्या गाडीनेच पेट घेतल्याने गाडी जळून खाक झाल्याची घटना घडली.

दोंडाईचा तालुक्यातील ताकारखेडा गावात काळ उसाच्या शेतात आग लागली होती. आग लागल्याने ती विझवण्यासाठी जवळील नगरपालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले होते. गाडी उसाच्या फडात दाखल होताच आग विझवण्याचं काम सुरु असताना गाडीलाच आग लागली . नंतर गाडी व ऊसाच्या शेतातील आग आटोक्यात आणण्यात यश आले ,परंतु तोपर्यंत अग्निशमन गाडी पुर्ण पणे जळून खाक झाली होती.