‘कोरोना’च्या काळात नवीन शब्द : ऑक्सफोर्ड डिक्शनरीनं निर्देश न मानणार्‍यांना म्हंटलं ‘कोविडियट’

पोलीसनामा ऑनलाईन : आपण अश्या लोकांना भेटला असाल जे उघडपणे कोविड – 19 साथीच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या मार्गदर्शकतत्त्वे पाळण्यास नकार देतात. अशा लोकांना आपण काय सांगाल? ऑक्सफोर्ड अ‍ॅडव्हान्स लर्नर (Oxford Advanced Learner) डिक्शनरीमध्ये म्हटले आहे की, अशा लोकांना कोविडियट (कोविड + इडियट) म्हणतात. आणि हे अधिकृत आहे. आपण त्याच्या वेबसाइटवर देखील पाहू शकता.

कोविड – 19 साथीच्या काळात सामाजिक अंतर, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यासारखे अनेक नवीन शब्द उदयास आले. त्याखेरीज असे अनेक शब्द, म्हणी आणि संक्षिप्त शब्दांचा समावेश या यादीमध्ये करण्यात आला आहे. ऑक्सफोर्ड अ‍ॅडव्हान्स लर्नर डिक्शनरी (OALD) हा ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचा सर्वात मोठा इंग्रजी भाषेचा शब्दकोश आहे जो मूळ नसलेल्या लोकांसाठी प्रकाशित केला जातो. ऑक्सफोर्ड अ‍ॅडव्हान्स लर्नर डिक्शनरी गेल्या 20 वर्षात दर तीन महिन्यांनी त्याच्या यादीमध्ये नवीन शब्द जोडण्याची घोषणा करते. हे सहसा मार्च, जून, सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यात नवीन शब्द घोषित करते. परंतु 2020 मध्ये, त्याने मध्यभागी नवीन शब्द घोषित केले, जे कोविड – 19 साथीच्या आजारामुळे वापरले गेले आहेत.

हे नवीन शब्द जोडले
कोरोना, कोरोना व्हायरस, कोविड – 19 , कोविडियट, डीप -क्लीन, एल्बो बंप, एल्बम्प, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कम्युनिटी स्पॅड, कम्युनिटी ट्रान्समिशन, फ्लैटेन द कर्व, हँड जेल, हँड सॅनिटायझर, हेल्थ प्रोफेशनल, हर्ड इम्यूनिटी, हॉट झोन, जूम बॉम्ब, क्वारंटाईन, डूमस्क्रोलिंग, हायड्रोक्लोरोक्विन, एन्कोव्ह, पॅनिक बायइंग, पेशंट झिरो, पर्सनल प्रोटेक्टिव इक्यूपमेंट, पीपीई, सेल्फ आइसोलेट, सेल्फ -आयसोलेशन, सेल्फ-क्वारेन्टाईन, शेल्टर इन प्लेस, सोशल डिस्टंसिंग, वेट मार्केट, डब्ल्यूएफएच, वर्क फ्रॉम होम : ऑक्सफोर्ड अ‍ॅडव्हान्स लर्नर डिक्शनरीमध्ये समाविष्ट केलेले हे सर्व शब्द थेट किंवा अप्रत्यक्षपणे साथीच्या रोगाशी संबंधित आहेत.

उदाहरणार्थ, एल्बो बम्प या शब्दाचा अर्थ आहे कि, कोपऱ्याच्या साहाय्याने सुरक्षितपणे हाय- हॅलो करणे. कोरोना युगात ऑनलाइन क्लास आणि मीटिंग दरम्यान एक शब्द उदयास आला – झूम बॉम्बिंग. याचा अर्थ असा की, अशी परिस्थिती जेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान अचानक एखादी अज्ञात व्यक्ती दिसू लागते आणि बोलू लागते. सेल्फ क्वारंटाईन दरम्यान एकट्याने कॉकटेल पिणाऱ्यांना क्वारेंटीनी म्हटले जाते. दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीने चिंताग्रस्ततेमुळे अशा बातम्यांचा शोध सुरू केला, ज्यामुळे नैराश्य येते, तर त्याला डूम्सक्रोलिंग म्हणतात.

औषधांची नावेही प्रसिद्ध
कोरोना कालावधीत काही औषधांची नावेही खूप प्रसिद्ध झाली. जसे की हायड्रोक्लोरोक्विन आणि डेक्सामेथासोन. हाइड्रोक्लोरोक्विन हा शब्द 1951 मध्ये प्रथम वापरला गेला. 2020 मध्ये मलेरियाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या या औषधाचा प्रसार इतका झाला की, ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्येही त्याचे स्थान निर्माण झाले.

ऑक्सफोर्ड अ‍ॅडव्हान्स्ड लर्निंग डिक्शनरीचे संपादक नमूद करतात की, क्वारंटाईन, सेल्फ आयसोलेशन यासारखे महारामारीशी संबंधीत शब्द आधीपासूनच अस्तित्वात आहेत. त्यांचा वापर आता खूप सामान्य आहे. यापूर्वी कोरोना कालावधीत कोणतेही नवीन वैज्ञानिक किंवा तांत्रिक शब्द दिसले नाहीत. बरेच जुने, अस्पष्ट शब्द, ड्रॅग किंवा मेडिसिन टर्म समोर आले आहेत, जे दररोजच्या संभाषणात समाविष्ट झाले आहेत.