झिरो टू हिरो आणि हिरो टू झिरो डीएसके ग्राउंड रिपोर्ट 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यात एका तरुणाने सर्व सामान्य नागरिकाला हक्कच घर मिळाव आणि ते ही त्याला परवडेल अशा किमंतीमध्ये मिळावे यासाठी धडपणारी व्यक्ती म्हणजे डीएसके उर्फ दीपक सखाराम कुलकर्णी. डीएसके यांनी घराला घर पण देणारी माणसं या एका ओळीने खऱ्या अर्थाने सामान्य माणसाच्या मनात घर केले.सर्वाना घर उपलब्ध करून देत काही हजारांमध्ये सुरु केलेला व्यवसाय थोड्याच कालावधीमध्ये हजारो कोट्यवधीमध्ये पोहचला. याच दरम्यान डीएसकेंनी टोयोटा,फुटबॉलचा संघ आणि लोणी काळभोर येथे ड्रीम सिटी प्रकल्पासह महाराष्ट्रासह परदेशात देखील अनेक प्रकल्प उभारले. या प्रकल्पावर डीएसकेंनी लक्ष केंद्रित केले होते.हे सर्व व्यवस्थित चालले असताना डीएसके मुंबई येथून पुण्याकडे येताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला.त्या अपघातामध्ये त्यांचा चालक जागीच गेला.तर त्यात डीएसके जखमी देखील झाले होते.या अपघातानंतर डीएसके यांच्याकडे असलेले गुंतववणूकदारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यांचे वाढते वय आणि त्यांच्यानंतर आपण गुंतवून ठेवलेले पैशाचे काय होणार या मनस्थितीमध्ये सापडलेल्या गुंतवणूकदारांनी पैसे काढण्यास सुरुवात केली.

त्याच दरम्यान व्यवसायातील मंदी आणि नोटाबंदीचा देखील त्यांच्या व्यवसायाला अधिकचा फटका बसल्याचे डीएसकेंच्या बोलण्यातून अनेक वेळा जाणवले. त्यांनी कधी याची स्पष्टपणे कधी कबुली दिली नाही.या सर्व घडामोडीमध्ये त्यांच्या पत्नी हेमंती यांनी देखील महत्वाची भूमिका पार पाडत.व्यवसायाला हातभार लावण्याचे काम केले आहे.डीएसके ना यशस्वी उद्योजक म्हणून अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तर अनेक ठिकाणी मुलाखतीमधून त्यांनी तरुण वर्गासमोर जीवन प्रवास उलगडून दाखविला.त्यामुळे प्रत्येक तरुणाचे डीएसके आयडॉल झाले होते.काय व्हायचे तर डीएसके अशी प्रतिक्रिया तरुण वर्गामधून ऐकण्यास मिळत होती.

मात्र वर्षाभरापासून आर्थिक अडचणींमध्ये सापडलेले डीएसके बाहेर येतील अशी आशा सर्वांना होती. मात्र ते काही केल्या आर्थिक अडचणीतून बाहेर पडलेच नाही.तर दिवसेंदिवस अडचणींमध्ये वाढ होत गेली.ज्या व्यक्तींनी डीएसकेकडे पैसे गुंतवले होते.त्याचे व्याज वार्षभरापासून न मिळाल्याने आणि २०१४ ला फ्लॅट बुक करून देखील त्याचा ताबा न मिळाल्याने अनेक नागरिकांनी डीएसकेच्या ऑफिसकडे धाव घेतली.त्यावेळी प्रत्येकाला लवकरच पैसे आणि फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगितले गेले.मात्र तसे काही झाले नाही.अखेर डीएसके यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुंतवणूकदरांनी फसवणूक केल्याच्या आरोप करीत तक्रार दाखल केली.त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यात येऊन गुंतवणूकदरांची बैठक घेऊन डीएसकेंच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले.तर डीएसकेनी देखील यातून बाहेर पाडण्यासाठी अनेक राजकीय नेते मंडळाची भेट घेतली.

दरम्यानच्या काळात हाय कोर्टात सुनावणी सुरुवात झाली.त्या दरम्यान प्रत्येक वेळी न्यायालयाने डीएसकेंना आदेश दिले. मात्र त्यांनी त्याचे पालन न केल्याने दोन दिवसापूर्वी न्यायालयाने अटक करण्याचे आदेश देताच आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी दिल्ली येथून डीएसके आणि त्याची पत्नी हेमंती यांना पहाटेच्या सुमारास अटक केली.त्यानंतर त्यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने २३ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.यावेळी डीएसके यांच्या पत्नी हेमंती यांनी व्यवसाय हाती घेतल्यानेच व्यवसाय अडचणीत सापडला असा युक्तिवाद सरकारी वकिलांना केला असून डीएसके आणि त्यांच्या पत्नीची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलीस कोठडीत आज पहाटेच्या सुमारास डीएसके चक्कर येऊन पडले.त्यानंतर त्यांना तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासणी करण्यात आल्या असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

सर्व सामान्यांना हक्काचे आणि घरला घर पण देणारे डीएसकेंना आज स्वत:च्या घरा ऐवजी पोलीस कोठडीत रहावे लागत आहे. दुस-यांच्या घराला घरपण देता-देता डीएसके स्वत:च्या घराला घरपण देण्यास कमी पडले.