डोंबिवलीत डॉक्टर ‘सप्लाय’ विरोधात मोहीम ; ‘त्या’ डाॅक्टरांना नोटीसा

डोंबिवली: पोलिसनामा ऑनलाईन – शेड्युल एच औषधांचा साठा ठेवल्याबद्दल अन्न व औषध प्रशासनाने शहरातील जवळपास २५ बीएचएमएस डॉक्टरांना नोटीसा पाठवून त्यांच्याकडे असलेल्या औषधांच्या साठ्याची आणि डॉक्टर सप्लाय करणाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे औषध विक्रत्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान या प्रकाराबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात होता. मेडिकलवाल्यांप्रमाणेच डॉक्टरांचीही तपासणी करा. अशी मागणी जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख व सचिव विजय सुराणा यांच्या संघटनेने केली होती.याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील डॉक्टर मोठ्या प्रमाणात डिस्पेंनसिंग करत असल्यामुळे औषध विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत होते. आणि औषधाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात होती. होमिओपथी डॉक्टरांना ६ महिण्याचा ब्रिज कोर्स केल्यानंतर अलोप्याथीची प्रॅक्टिस कऱण्याची सरकारने परवानगी दिली असली तरी औषधे खरेदी करण्यास आणि साठा करण्यास कायद्यानुसार परवानगी नाही.

त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक नांदेकर यांनी सांगितले कि, काही डॉक्टरांनी होलसेलच्या माध्यमातून औषधांचा गैरपद्धतीने साठा खरेदी केल्याची माहिती एफडीए मिळाल्याने औषध विक्रेत्यांकडे चोकशी केली असता. डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणावर औषध खरेदी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे डॉक्टर ज्या ठिकाणी काम करत आहेत. त्याठिकाणी जवळपास ४०० पेक्षा जास्त औषधांचे दुकाने आहेत. त्यामुळं अशी चुकीच्या पद्धतीने औषध खरेदी करण्याची गरज नाही. चुकीच्या पद्धतीने औषध खरेदी केल्यामुळे जवळपास २५ संशयित डॉक्टरांना नोटीस पाठवल्या आहेत. अशी माहिती नांदेकर यांनी दिली.