नॅशन इन्स्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशननं बदलले स्त्री-पुरूषांचं सामान्य वजनाचे ‘मापदंड’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम : भारतीयांसाठी आदर्श वजनाच्या मानकांमध्ये आता बदल झाला आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) ने आता भारतीयांच्या वजन प्रमाणात ५ किलो वाढ केली आहे. उदाहरणार्थ, २०१० मध्ये भारतीय पुरुषांचे वजन प्रमाण ६० किलो होते, जे आता ६५ किलो केले गेले आहे. त्याच वेळी, २०१० मध्ये स्त्रियांचे प्रमाणित वजन ५० किलो होते,ते वाढून ५५ किलो झाले आहे.

वजनाबरोबरच भारतीय स्त्री-पुरुषांच्या उंचीच्या मानकांमध्येही बदल करण्यात आले आहेत. २०१० च्या एनआयएनच्या (NIN) मानकांनुसार भारतीय पुरुषांची संदर्भ लांबी ५.६ फूट आणि महिलांची लांबी ५ फूट होती. परंतु आता बदललेल्या मानकानुसार पुरुषांची सरासरी लांबी आता ५.८ फूट आणि महिलांची लांबी ५.3 फूट करण्यात आली आहे. आता सामान्य बॉडी मास इंडेक्स (BMI) ची तपासणी केवळ या पॅरामीटर्सवर केली जाईल. बॉडी मास इंडेक्स वजन आणि लांबीच्या गुणोत्तरातून काढले जाते. एखाद्या व्यक्तीचे वजन जास्त किंवा वजन कमी आहे का हे निर्धारित बीएमआयद्वारे केले जाते.

वैज्ञानिकांच्या मते भारतीयांच्या आहारात पौष्टिक आहार वाढला आहे. म्हणूनच, त्यांच्या बॉडी मास इंडेक्समध्ये हे बदल केले गेले आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील लोकांचादेखील या डेटामध्ये समावेश करण्यात आला आहे. १० वर्षांपूर्वी केलेल्या अभ्यासात केवळ शहरी भागातील लोकांचाच समावेश होता.

आयसीएमआर एक्सपर्ट कमिटी नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनने देखील प्रौढ पुरुष आणि स्त्रियांसाठी आवश्यक प्रमाणात कॅल्शियम वाढविले आहे. आता प्रति दिन १००० ग्राम आहे. वर्ष २०१० मध्ये दररोज ६०० मिलीग्राम कॅल्शियमची मात्र निर्धारित केली होती. रजोनिवृत्तीनंतर (मेनोपॉज ) १२०० ग्राम कॅल्शियम घेण्याचा सल्ला महिलांना देण्यात आला आहे.

याशिवाय दररोज ५ ग्रॅम मिठाचे सेवन करणे आवश्यक आहे. तेव्हाच सोडियमचे प्रमाण 2 ग्रॅम पर्यंत मर्यादित राहील. दररोज ३५०० ग्राम पोटॅशियम घेण्याची सूचना दिली आहे.