पुणे महापालिकेत मनसेकडून गाजर हलवा वाटून,भाजपचा निषेध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन
केंद्रात,राज्यात आणि महापालिकेत भाजपची सत्ता असून त्यांनी निवडणुकीच्या काळात अनेक आश्वसने दिली. हे सरकार मात्र ती पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने भाजपने आज अखेर जनतेला गाजर दाखवण्याचे काम केले आहे. भाजपच्या निषेधार्थ आज पुणे महापालिकेत मनसेचे गटनेते वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना गाजरचा हलवा वाटून निषेध व्यक्त केला.यावेळी मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर, माजी नगरसेविका रुपाली पाटील आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.