मौज मज्या करण्यासाठी अल्पवयीन मुलांनी चोराल्या दुचाकी

निगडी :  पोलीसनामा ऑनलाईन

मौज मज्या करण्यासाठी दुचाकींची चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.त्यांच्याकडून ७ लाख ३३ हजार रुपयांच्या ऐकूण २० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही कामगिरी निगडी पोलिसांनी केली असून त्यांच्याकडून ऐकूण १६ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,निगडी पोलिसांची गस्त सुरू असताना बर्ड व्हॅली येथे दोन अल्पवयीन सराईत गुन्हेगार आल्याची माहिती पोलिसांना खबऱ्या मार्फत मिळाली होती.त्यानुसार सापळा रचून त्यांच्यावर कारवाई केली.त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता.त्यांनी १६ वाहनचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली,त्यांच्याडून ऐकूण २० दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.चोरीच्या दुचाकी विकत घेतल्या होत्या त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

संजय लक्ष्मण गुदडावत वय-३२, शिवभगत राजकमल बिरावत वय-२८, इकबाल रामसिंग बिरावत वय-२८ अशी ताब्यात घेण्यात आलेल्या इसमानची नावे आहेत.अल्पवयीन आरोपी हे ग्रामीण भागातील दारू विक्रेत्यांना अवघ्या ४ ते ५ हजार रुपयात दुचाकी विकत होते.ते बनावट चावी द्वारे आणि हँडल लॉक तोंडून दुचाकी लंपास करायचे.याच अल्पवयीन आरोपींना निगडी पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात ऑगस्ट महिन्यात जेरबंद केलं होतं मात्र अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधागृत ठेवल्यानंतर सोडण्यात आले होते.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे,पोलीस उपायुक्त गणेश शिंदे,सहायक पोलिस आयुक्त सतीश पाटील यांच्या मर्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले,पोलीस निरीक्षक गुन्हे शंकर अवताडे,फारूक मुल्ला,नितीन बहिरट,मंगेश गायकवाड, नारायण जाधव, तात्या तापकीर, रमेश मावसकर, राम साबळे, जमीर तांबोळी, किशोर पढेर, विलास केकाने, मच्छीन्द्र घनवट यांनी केली आहे.