रुमालवर प्रेयसीचे नाव लिहून तरूणाने घेतला गळफास

पुणेः आॅनलाईन पोलीसनामा

वडगावमधील जाधवनगर या ठिकाणी खासगी हॉस्टेलमध्ये रुमालावर प्रेयसीचे नाव लिहून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी घडला. आत्महत्या ग्रस्त तरुणाचे नाव हे विष्णु उर्फ बाबु देना टुडु (25) असे असून त्याने राहत्या हॉस्टेलमध्ये मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास आत्महत्या केली.
विष्णु उर्फ बाबु टुडु हा पश्‍चिम बंगाल राज्यातून कामानिमित्त पुण्यात आला होता. घरची जेमतेम परिस्थिती असलेल्या बाबु याने मिळेल त्याठिकाणी काम करत आपला उदरनिर्वाह चालवत होता.
सिंहगड रोड वरील गोयलगंगापरिसरात माणिक बाग चौका शेजारी दुर्गा कॅफे आहे. या ठिकाणी तो काही दिवसापासून कामाला होता. त्यानंतर काही कारणास्तव त्याला हे काम सोडणे भाग पडले. त्यानंतर शनिवार दि. 3 फेब्रुवारी या दिवशी तो दुर्गा कॅफे येथे आपल्याला पुन्हा काम मिळावे अशी विचारपूस करण्यासाठी आला होता. परंतु, त्याच रात्री उशीरा त्याने जाधवनगर-वडगाव येथे राहायला असलेल्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांना त्याच्याजवळ असलेल्या रुमालावर काही मजकूर लिहीलेला दिसला. या मजकूरात मुलीचे नाव आणि त्या संदर्भात मजकुर लिहीला होता. नोकरी नसल्यामुळे नैराश्‍येतून आणि प्रेयशीने संबंध टाळल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची शक्‍यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. या घटनेचा अधिक तपास सिंहगड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक साळुंके करत असल्याची माहिती सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. एस. वाडेकर यांनी दिली.