शासकीय मुद्रणालयातील गोडाऊनला आग

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

शहरातील शासकीय मुद्रणालय (फोटोझिंको) कार्यालयामधील एका गोडाऊनला आज सायंकाळी सहाच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी घटनास्थळी दाखल होवून आगीवर नियंत्रण मिळविले. शासकीय मुद्रणालय कार्यालयातील या गोडाऊनमध्ये कागदपत्रे ठेवलेली होती. गोडाऊन बाहेर अनेक प्रकारचा पालापाचोळा, लाकडे होती. अगोदर बाहेरच्या पाला पाचोळ्याला आग लागली त्यानंतर ती पसरत गोडाऊन पर्यंत पोहचली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे पुढील गोडाऊन आगीपासून वाचली. साधारण एक तासाच्या अथक परिश्रमानंतर आगिवर नियंत्रण मिळविण्यास जवानांना यश आले.