Aloe Vera And Beetruth Serum : चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी ‘या’ 2 गोष्टींचं सीरम वापरा, स्पष्ट फरक दिसून येईल

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – वय वाढण्याबरोबर आपल्या चेहऱ्यावर वयाचा स्पष्ट परिणाम दिसू लागतो. वय वाढायला लागले की, चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. वाढत्या वयाचा परिणाम आपण थांबवू शकत नाही परंतु तो कमी करता येतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही कोरफड आणि बीटपासून बनविलेले सीरम वापरू शकता. आपण घरी सहजपणे हा सीरम बनवू शकता. बाजारातील उपलब्ध असलेले अँटी एजिंग क्रीम आपला चेहरा खराब करू शकते, परंतु घरगुती कोरफड (Aloe Vera) आणि बीट सीरम वापरल्यास आपल्या त्वचेवरील सुरकुत्या मुक्त होऊन चेहरा सुंदर दिसू लागतो. घरी कोरफड (Aloe Vera) आणि बीट सीरम कसा बनवायचा ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सीरम बनवण्याची पद्धत
सीरम तयार करण्यासाठी प्रथम बीट घ्या. बीटचे साल सोलून घ्या आणि त्याचे छोटे तुकडे करा. यानंतर, ते मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. बीट बारीक वाटून घ्या आणि थोडेसे पाणी घाला. ही पेस्ट पेस्ट गाळून घ्या. या बीटमध्ये 1 चमचे एलोवेरा जेल घाला. यानंतर ही पेस्ट फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर ही पेस्ट चेहर्‍यावर लावा.

सीरमचा वापर कसा करावा
कॉटनच्या मदतीने चेहऱ्यावर सीरम लावा. हे मिश्रण आपण फेसपॅकसह आपल्या चेहर्‍यावर देखील लावू शकता. आठवड्यातून 2 वेळा हा फेस पॅक लावल्यास चेहऱ्याला चमक येते.

सीरमचे फायदे
सीरममध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. जे त्वचेचे कोलेजेन वाढविण्यात मदत करते. त्वचा टाइट ठेवण्यास मदत करते. आपण दररोज आपल्या चेहऱ्यावर हा सीरम वापरू शकता. सीरमच्या वापरामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील.